खा. संजय राउतांची घणाघाती टीका
नाशिक : प्रतिनिधी
भाजपाला छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल कधीच प्रेम नव्हते. जेव्हा छत्रपतींचा अपमान झाला त्यावेळी यांची वाचा गेलेली असते. तसेच शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, कचऱया समोर मुख्यमंत्री भाषण करतात. ठाकरे गटातून शिंदे गटात जाणारे चोर, लफंगे आणि कचरा असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राउत यांनी शिंदे गटावर केली.
शुक्रवारी खा. राउत नाशकात दाखल झाले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून आउटगोइंग वाढून शिंदे गटात इनकमींग सुरु झाल्याने या पार्श्वभूमिवर खा. राउत नाशिक दौर्यावर आल्याने यास महत्व प्राप्त झाले आहे. विशेषत: खा. राउत शुक्रवारी नाशिक दौर्यावर येण्याआधीच सकाळी तब्बल पन्नासहून अधिक शिवसेना पदाधिकार्यांनी मुंबइत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश झाला. हे प्रवेश शिंदे गटाचे सचिव व ठाकरे गटात असताना राउतांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाउसाहेब चौधरी व माजी विरोधी पक्षनेते यांनी घडवून आणल्याचे बोलले जात आहे. नाशकात येताच खा. राउत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, समृद्धीच्या टक्केवारीतुन पक्ष बनत नाही, पक्ष हा रक्त घामातुन बनत असल्याची जळ्जळीत टीका यावेळी त्यांनी केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाच लाख कोटींची गुणतवणुक महाराष्ट्रातुन नेता आणि आमच बिर्हाड जर्मणीला गुणतवणुक आणण्यासाठी जात असल्याची टीकाही राउतांनी यावेळी केली.
नारायण राणेंना उत्तर दिल्या पासुन त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृत्ती साठी चांगल असल्याचा टोला त्यांनी राणे यांना लगावला. त्यांनी माझ्यांशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझ नाव संजय राऊत आहे , राणे तुम्ही गुंड,तर मी महागुंड , कुठे येवु, मी कुणालाही घाबरणार नाही, कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही. नाशिक शहरामधुन शिंदे गटात गेलेल्या मध्ये एखाद दुसर नाव परिचयाच असेल मात्र इतर कोण आहेत. हे आम्हाला माहिती नाही.
खा. राउत पदाधिकार्यांशी साधणार संवाद
नाशिक शहराचा आजवर असलेला ठाकरे गटाचा अभेद गडाला मागील महिन्यापासून सुरुंग लागला आहे. एकएक करुन माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षाला सोडचिट्ठी देत शिंदे गटात जाणे पसंत करत आहे. पक्षाची आणखी पडझड होउ नये याकरिता खा. संजय राउत यांनी पुन्हा नाशिकला येत पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहे. यासह पदाधिकार्यांचा मेळावाही ते घेणार आहे.
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…