नाशिक

नाशिकमे फॉग चल रहा है..!

नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या दोन दिवसांपासून काय चाललय असा प्रश्‍न पडला असेल तर त्याच उत्तर आहे. फॉग चल रहा है. उत्तरेकडून येणार्‍या  शितलहरीचा परिणाम म्हणून मागील दोन दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्यामुळे वातावरणात दिवसभर गारठा जाणवत आहे. त्यात थंडीसह दाट धुके पडत असल्याने गारवा अधिक जाणवत आहे. धुक्यामुळे सुर्य दर्शन लवकर होत नसल्याचे चित्र आहे. सकाळ आणि संध्याकाळच्यावेळी पडत असलेल्या दाट धुक्यामुळे वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागत आहे. धुक्यामुळे वाहनाचा अंदाज न आल्याने अपघातांची शक्यता असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक मंदावत आहे. तर जॉगिगसाठी बाहेर पडणारे नागरिक मात्र गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.  सकाळच्यावेळी कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी  शेकोट्या पेटत आहेत.

नाशिक शहरात दरवर्षीच हिवाळ्यात दाट धुके पडते. धुक्यामुळे थंडीचा प्रभाव  कमी  होतो. मात्र यंदा शितलहरी असल्याने धुके पडले तरी थंडी जाणवत आहे.  शहरातील नागरिक कडाक्याच्या थंडीचा आणि धुक्याचा आनंद घेत असले तरी ग्रामीण भागात मात्र शेती पिकांना  धुक्यामुळे नुकसान होणार तर रबी पिकांसाठी थंडी पोषक ठरत असते.

गोदाघाटावर मात्र थंडी आणि धुक्यामुळे मनमोहक वातावरण आहे. थंडीमुळे सकाळी आणि संध्याकाळी गोदाकाठी नागरिकांची वर्दळ कमी असल्याने निरव शांतता जाणवत आहे.

शहरातील        किमान आणि कमाल तापमान

1 जानेवारी      10.0           30.7
2 जानेवारी       10.2          30.2
3 जानेवारी       10.6          30.4
4 जानेवारी        13.2         24.7
5 जानेवारी       13.2          25.7
6 जानेवारी       17.             27

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago