नाशिक

कायद्याच्या बालेकिल्ल्याला पुन्हा खिंडार

खुटवडनगरमध्ये तरुणावर तलवारीने वार

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुटवडनगर परिसरात सलग दुसर्‍या दिवशी शस्त्रधारी टोळक्याने दहशत माजवली. या घटनेत एका तरुणावर धारदार तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले गेले.
या घटनेत श्रीपाद अपार्टमेंटजवळील गेटला एका एमएच 15 जेडब्ल्यू 4824 या क्रमांकाच्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याचे नागरिकांनी पाहिले. गाडीच्या धडकेत काही जण जखमी झाले होते.
स्थानिकांनी त्वरित मदत केली; मात्र गाडीचालकाने नंतर ताब्यातून पळ काढला. या दरम्यान नागरिकांनी 112 वर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी येऊन जखमी दोघांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर गाडीतील टोळक्याचे सर्व सदस्य, हातात तलवार, दांडे आणि कोयते घेऊन पुन्हा घटनास्थळी आले. यावेळी त्यांनी किशोर मटाले यांच्यावर धोकादायक तलवारीने हल्ला केला. मटाले जखमी झाले आणि त्यानंतर टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत संशयितांंची धरपकड सुरू होती. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले.
सदर घटना खुटवडनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असून, पोलीस प्रशासन तातडीने कडक पावले उचलत आहे.

पोलिसांचे गुन्हेगारांशी जवळचे संबंध

अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाच्या कर्मचार्‍यांचे गुन्हेगारी जगताशी निगडित असलेल्या गुन्हेगारांशी अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्याऐवजी गुन्हेगारी वाढीसाठी खतपाणी घालत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी करत अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकात बदल करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे

कायद्याच्या बालेकिल्ल्यात गुन्हेगार वाढले

गेल्या तीन ते चार दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, परिसरातील नागरिक पुरते भयभीत झाले आहेत. मंगळवारी रात्री प्रणव शेवाळे आणि कुंदन परदेशी यांच्यात जुन्या वादाची ठिणगी पडली आणि याचा वचपा काढण्यासाठी कुंदन परदेशीसह कुणाल एखंडेसह 20 ते 25 संशयितांनी पिकअपमध्ये धारदार तलवारी, चॉपरसह कोयते टाकून सर्व संशयित प्रणव शेवाळे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने गेले होते, मात्र प्रणव शेवाळे याचे दैव बलवत्तर म्हणून तो वाचला असला तरी याचे पडसाद सर्वसामान्य नागरिकांवर पडले आहे. ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत.

The citadel of law is under attack again.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago