नाशिक

चांदवड-निफाड मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात

दोन तरुणांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

चांदवड : वार्ताहर
चांदवड-निफाड मार्गावरील गणूर ते परसूलदरम्यान गुरुवार, दि. 29 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
चांदवड-निफाड मार्गावर गणूर ते परसूलदरम्यान दुचाकी क्र. एम. एच. 15 जी. जी. 7624 आणि क्र. एम. एच. 15 के. डी. 3024 या दोन्ही दुचाकींची समोरासमोर झालेली धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात प्रसाद विनायक शिंदे (वय 22, रा. देवरगाव) आणि गणेश पंडू बरडे (वय 23, रा. आसरखेडे) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तसेच संकेत अरुण ठाकरे (वय 21, रा. गणूर), अजिंक्य अण्णासाहेब शिंदे (वय 22, रा. देवरगाव) आणि बाळू सखाराम गोधडे (वय 21, रा. गोई, चांदवड) हे तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. संकेत ठाकरे याला पुढील उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे हलवण्यात आले असून, उर्वरित जखमींवर चांदवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
ऐन तारुण्यात दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने देवरगाव आणि आसरखेडे परिसरात शोककळा पसरली आहे.

Fatal accident involving two bikes on Chandwad-Nifad road

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

8 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

16 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

21 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

27 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

33 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

47 minutes ago