नाशिक

जानेवारीअखेर शहराला मिळणार महापौर

आरक्षण सोडतीकडे लक्ष, भाजपांतर्गत लॉबिंग सुरू

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचे मैदान भाजपने पुन्हा मारत तब्बल 72 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे साहजिकच नाशिक महापालिकेचा महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित झाले आहे. दोन-तीन दिवसांत आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षण सुटेल याचे आखाडे बांधत भाजपमध्ये आतापासूनच महापौर पदासाठीचे लॉबिंग सुरू झाले आहे.

सन 2017 मधील महापालिका निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी भाजपचे 66 नगरसेवक निवडून आले होते आणि पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. दुसर्‍या अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आणि भाजपकडून प्रभाग ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची निवड झाली होती.
यंदा महापौरपदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण लागू होईल, हे ठरल्यावरच भाजपकडून संभाव्य उमेदवाराचे नाव निश्चित होणार असल्याचे समजते. आतापासूनच महापौरपदासाठी लॉबिंग व इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातील संभाव्य उमेदवार वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत आहेत.
पक्षांतर्गत पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगत आहे. महापौरपदाचे आरक्षण मुंबई येथील सोडतीद्वारे ठरविले जाणार आहे. पहिले अडीच वर्ष महापौरपद ओबीसी किंवा एससी महिला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नूतन नगरसेवकांची लवकरच राजपत्रात नोंद

महानगरपालिकेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा राज्य निवडणूक आयोगाकडून निवडून आलेल्या 122 उमेदवारांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत उमेदवाराचे नाव, प्रभाग क्रमांक, आरक्षणाचा प्रकार आणि पक्ष अथवा अपक्ष, अशी सविस्तर माहिती नमूद केली आहे. प्रमाणित यादी मनपाकडून एक ते दोन दिवसांत शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवली जाणार आहे. महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्यामार्फत आवश्यक कागदपत्रांसह हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. नगरविकास विभागाकडून प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची नावे शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. ही प्रसिद्धी म्हणजे निवडून आलेल्या प्रतिनिधींना अधिकृत मान्यता मिळाल्याची अंतिम अधिसूचना असते.

महापौरांची कारकीर्द व आरक्षण

महापौर                          कालावधी                      आरक्षण
वसंत गिते                     1997-1998                 ना.मा.प्र.
अशोक दिवे                   1998-1999                   अ.जा.
डॉ. शोभा बच्छाव           1999-2002               महिला सा.
दशरथ पाटील                2002-2005                 खुला
बाळासाहेब सानप          2005-2007              ना.मा.प्र.
विनायक पांडे                2007-2009                  खुला
नयना घोलप                2009-2012                 अ.जा.
अ‍ॅड. यतीन वाघ           2012-2014                   खुला
अशोक मुर्तडक             2014-2017                ना.मा.प्र.
रंजना भानसी               2017-2019                    अ.ज.
सतीश कुलकर्णी           2019-2022                    खुला

(1992 ते 1997 पर्यंत आरक्षण पद्धत नव्हती.)

The city will get a mayor by the end of January.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago