महाराष्ट्र

मुंबईत महापौर निवडीच्या हालचालींना वेग

शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी

मुंबई :
अटीतटीच्या लढतीनंतर पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला अवघ्या फरकाने बहुमत मिळाले आहे. एकूण 118 जागा जिंकत महायुतीने काठावर सत्तास्थापनेसाठी आवश्यक आकडा गाठला. यामध्ये भाजपाने 89 जागा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. निकाल जाहीर होताच आता महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या आणि महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
या संपूर्ण समीकरणात 29 नगरसेवकांसह शिंदेसेना निर्णायक भूमिकेत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चाल टाकण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वीपासूनच मुंबईत भाजपाचाच महापौर होणार, अशी ठाम भूमिका भाजपाकडून मांडली जात होती. मात्र निकालानंतर भाजप बहुमतापासून दूर राहिल्याने सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य ठरला आहे. याच पाश्वर्र्भूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर बसवण्याची परंपरा असल्याचा दाखला देत एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेत सत्तेच्या वाटपात भाजपाने शिंदेसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या मागण्यांमुळे महापौरपदावरून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात मतभेद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही महापौरपदावर दावा केला जात आहे. देवाच्या मनात असेल तर मुंबईत आमचाच महापौर बसेल, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं असून, शिंदे गटातील नगरसेवकांना उद्देशून भावनिक आवाहनंही केली जात आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीभोवती राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. या सार्‍या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाव्य फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे विजयी झालेले सर्व 29 नगरसेवक सुरक्षित ठिकाणी, हॉटेलमध्ये ठेवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी सुरू असलेल्या या राजकीय रस्सीखेचीत पुढील काही दिवसांत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोडेबाजार रोखण्यासाठी हे केले जात आहे. सर्व 29 नगरसेवकांना बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, म्हणजेच त्यांना पुढील तीन दिवस तिथेच राहावे लागेल. यापूर्वी, 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर, अविभाजित शिवसेनेने मनसेच्या सात नगरसेवकांना पक्षांतरित केले होते.
2022 च्या बंडाच्या आठवणीही झाल्या ताज्या
शिंदे गटाच्या हॉटेलमधील मुक्कामामुळे 2022 च्या बंडाच्या आठवणीही ताज्या झाल्या ज्यामुळे शिवसेनेत फूट पडली. मे 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड केले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत उपाध्यक्षांविरुद्ध अविश्वासाची नोटीसही बजावली, ज्यामुळे उपाध्यक्षांना शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापासून रोखले गेले. या संपूर्ण घटनेदरम्यान, 20 जून 2022 रोजी शिवसेनेचे 15 आमदार, 10 अपक्ष आमदारांसह, सुरत आणि नंतर गुवाहाटीला रवाना झाले. 23 जून रोजी शिंदे यांनी दावा केला होता की, त्यांना 35 आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमत चाचणी आणि उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर, 30 जून 2022 रोजी शिंदे मुख्यमंत्री झाले.

उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात

शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. देवाची इच्छा असेल तर मुंबईत आपला महापौर बसू शकतो, असे सूचक वक्तव्य करून सत्तेसाठीची समीकरणे जुळवत असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. असे असताना उद्धव ठाकरे यांचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आमच्यावर संशय घेऊ नका : संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुंबईचा महापौर शिवसेना ठाकरे बंधूंचा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झाल्या आहेत. मी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत, असे स्पष्ट करत मी आणि काही नेते आज ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. मला कालच जायचे होते, पण समजले इथे तर कोंडवाडा झाला आहे. मात्र, आमच्यावर संशय घेऊ नका, असे सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि.18) माध्यमांशी बोलताना
केले.

Mayoral election moves gain momentum in Mumbai

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago