महाराष्ट्र

राणे बंधूंमधील संघर्ष टोकाला

नीलेश राणेंचे स्टिंग ऑपरेशन

सिंधुदूर्ग :
शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी नीलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. यावर नीलेश राणेंचे बंधू मंत्री नितेश राणे यांनी आम्ही जर असा हंगामा केले तर काय होईल. हमाम खाने मे सब नंगे, अशा शब्दांत त्यांनी स्टिंग ऑपरेशनवर टीका केली.
रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले. त्यानंतर वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे, असे म्हणत नीलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करून निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत, असा आरोपही नीलेश राणेंनी केला. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार असून पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा आरोपहीदेखील नीलेश राणेंनी केला. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की, रवींद्र चव्हाण जेव्हा जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा वेगळं वातावरण निर्माण होतो. ते काल जिल्ह्यात आले. मला थोडा संशय आला की, हे असेच सहज आलेले नाहीत, अशी टीकाही नीलेश राणेंनी बोलताना केली.
नीलेश राणेंच्या मालवणमधील स्टिंग ऑपरेशननंतर आणि केलेल्या टीकेवरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. नीलेश राणेंच्या आरोपावर भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. भाजपचे नेते नितेश राणे यांनी रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपर्‍यात जावं लागतं. राजकीय चष्म्याने त्याला पाहावं. उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर?, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.
आमचे स्वतःचे व्यवसायपण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत.

युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेली : नितेश राणे

रवींद्र चव्हाण यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेलं नाहीय. आम्हाला युती करायची होती, तुम्ही का केली नाही?, तुम्ही साधा फोनही उचलला नाही, असे नीलेश राणे म्हणाले. भाजपचे पदाधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या पगारावर आहेत, असेही नीलेश राणेंनी सांगितले. यावरदेखील नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची पद्धत आहे, केव्हातरी तुम्ही समजून घ्या. तो प्रक्रियेचा भाग असतो.

मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायचीय : रवींद्र चव्हाण

शिवसेना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवरून राज्यात महायुतीत मोठी कुस्ती सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यास सुरुवात केल्याने शिंदे गोटात मोठी खळबळ उडाली होती. खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात चव्हाणांनी पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केली आणि या वादाला ठिणगी पडली होती. उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीपर्यंत तक्रार करून झाली. परंतु काहीच फरक पडला नाही. अशातच बुधवारी आमदार नीलेश राणे यांनी मालवणमध्ये चव्हाण भेट देऊन गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत त्याच्या घरी पैशांच्या थप्प्या असलेली पिशवी पकडली होती. यावर आता चव्हाणांनी मोठे भाष्य केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष गुरुवारी जळगाव दौर्‍यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी नीलेश राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारले. सुरुवातीला चव्हाण यांनी काढता पाय घेतला. परंतु नंतर कारची काच खाली करून मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची.

 

 

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago