त्र्यंबकेश्वरमध्ये रेंगाळलेल्या विकासकामांचा बोजवारा

त्रस्त नगरसेवक, नागरिकांचा ‘पुरे झाला विकास’ म्हणत प्रशासनाविरोधात आक्रोश

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांनी प्रचंड गैरसोय निर्माण केली असून, नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ठेकेदारांच्या मनमानी व संथ कारभारामुळे आणि नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपूर्वी निवडून आलेले नगरसेवक आणि स्थानिक नागरिक आता संतप्त झाले असून, त्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील वाहनतळ ते मंदिर हा मुख्य रस्ता गेल्या दोन महिन्यांपासून खोदलेला आहे. या खोदकामामुळे भूमिगत गटारी फुटल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्ते खोदल्यामुळे वीज, पिण्याचे पाणी आणि फायबर इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.
अनेक भागांत दोन महिन्यांपासून नळांना पाणी आलेले नाही. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच रस्ते खोदल्यामुळे धूळ आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन शहरात डेंग्यू व काविळीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

या समस्येबाबत प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाला लेखी पत्र देऊन पोस्ट लेन परिसरातील भुयारी गटार कामातील तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पाण्याचा निचरा न होणारी चुकीची कामे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक विष्णू दोबाडे यांनीही यापूर्वीच बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाचे पुनरागमन झाल्याने आता हा त्रास पावसाळा संपेपर्यंत सोसावा लागणार असल्याचे स्पष्ट होत असून, नागरिकांनी आता पुरे झाला विकास, असा सूर आळवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निकृष्ट दर्जाचे काम अन् मौन

रस्त्यांची व चेंबरची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा थेट आरोप नगरसेवकांनी केला आहे. जलवाहिनी आणि वीजवाहिन्यांसाठी वापरण्यात येणारे पाइप अत्यंत सुमार दर्जाचे असून, चेंबरसाठी वापरलेल्या विटाही हलक्या प्रतीच्या आहेत. अनेक ठिकाणी चेंबर व पाइपलाइन आताच फुटू लागल्या आहेत. संबंधित ठेकेदाराने क्षमतेपेक्षा जास्त कामे घेतली असून, त्याच्याकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रसामग्री नाही. तरीही बांधकाम आणि पाणीपुरवठा विभाग ठेकेदाराला जाब विचारण्यास धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हॉटेल व्यावसायिक अडचणीत

मुख्य रस्ता बंद असल्याने हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिक गेल्या दोन महिन्यांपासून हात बांधून बसले आहेत. ग्राहक येत नसल्याने येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. एकीकडे व्यावसायिक हजारो रुपये कमर्शियल दराने पाणीपट्टी भरत असताना त्यांना नळाचे पाणी मिळत नाही आणि प्रशासनाकडून त्यांना टँकरचे पाणी देण्यासही स्पष्ट नकार दिला जात आहे, ज्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांमध्ये तीव्र संताप आहे.

भाविकांचे हाल अन् बंद रस्ते

शहरात येणार्‍या भाविकांना समोर मंदिर दिसत असूनही तिथे पोहोचणे कठीण झाले आहे. दर्शन पास घेणे किंवा दर्शन घेऊन परत वाहनतळाकडे जाणे रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अत्यंत कसरतीचे ठरत आहे. संत निवृत्तिनाथ मंदिर रस्ता, गौतम तलावाचा रस्ता, बीएसएनएल कार्यालय ते ब्रह्मगिरी मार्ग, गंगाद्वार पायथा, निर्मल आखाडा ते महाजन चौक आणि महादेवी रस्ता या प्रमुख मार्गांवरील रहदारी गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. नागरिकांना चालण्यासाठीही जागा उरलेली नाही.

लोकप्रतिनिधी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

The delay in development works in Trimbakeshwar is a disaster

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *