नाशिक

वंचित फुंकणार महापालिका निवडणुकांचे रणशिंग!

सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत 12 ला कार्यकर्ता मेळावा

नाशिक : प्रतिनिधी
आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते येत्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असून, वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. सुजात आंबेडकर काय भूमिका मांडणार? याकडे कार्यकर्त्यांचेे लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या गुरुवारी (दि.12) शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सकाळी दहा वाजता भव्य कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. यावेळी सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, ते कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, हे कळेल. दरम्यान, आगामी महापालिका, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भाजपा सोडून अन्य कोणत्याही पक्षाशी युती करा, असा संदेशच पक्षप्रमुख बाळासाहेब तथा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा दिलेला नारा या पार्श्वभूमीवर वंचितच्या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महानगरप्रमुख अविनाश शिंदे असणार आहेत. प्रमुख पाहुणे राजेंद्र पातोडे, दिशा पिंकी शेख, चेतन गांगुर्डे, अरुण जाधव, वामनदादा गायकवाड, शभिमाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड, युवा जिल्हाप्रमुख दामोधर पगारे, युवा महानगरप्रमुख रवी पगारे मार्गदर्शन करणार आहेत.संजय साबळे, दीपक पगारे, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, महीर गजबे, संदीप काकळीज, सुनील साळवे, रेखा देवरे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विश्वनाथ भालेराव सूत्रसंचालन करतील.

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका वंचितसाठी महत्त्वाची आहे. शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी केली आहे. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असेल. प्रत्येक पालिकेसाठी प्रत्येक प्रभागात आमच्याकडे उमेदवार आहेत. जिल्हा परिषदलादेखील प्रतिसाद मिळतो आहे. गुरुवारी पक्षाचे युवानेते सुजात आंबेडकर कार्यकर्ता मेळाव्यातून मोलाचे मार्गदर्शन करणार असल्याने त्यास शहर-जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.
-डॉ. अविनाश शिंदे, महानगरप्रमुख, वंचित बहुजन आघाडी

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago