नाशिक

अंगणवाडी सेविकांना शिक्षिकेचा दर्जा देणार

मनोरंजनातून शिक्षण म्हणजेच हसतखेळत शिक्षणाला प्राधान्य

निफाड : विशेष प्रतिनिधी
राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा दिला जाणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात मनोरंजनातून शिक्षण म्हणजेच हसत खेळत शिक्षण या तत्त्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे, चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी आणि ती कायम राहावी, या हेतूने विद्यार्थ्यांना अक्षर, अंक, रंग, आकार ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षरे याचे शिक्षण आता अंगणवाडीसेविका देणार आहेत. त्यामुळे आता अंगणवाडीसेविकाच चिमुकल्यांच्या शिक्षिका होणार आहेत. हे शिक्षण आता सेविका अधिक प्रभावी आणि योग्य पद्धतीने देतील. राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
याअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा दिला जाणार आहे. याशिवाय, याअंतर्गत अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलण्यात येणार आहे. त्यानुसार प्राथमिक शाळांतील पहिलीच्या शिक्षकांना तसेच अंगणवाडीसेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील 553 एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तब्बल एक लाख 10 हजार 556 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यामध्ये सव्वा लाखापेक्षा अधिक अंगणवाडीसेविका आहेत. यापैकी बारावी उत्तीर्ण सेविकांना प्राथमिक टप्प्यात सहा महिन्यांचे आणि दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बालशिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे सेविकांना 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना कसे शिकवायचे, त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी कोणत्या उपक्रमांचा वापर करायचा, याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. पालकांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. सर्व अंगणवाडी सेविकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी, त्यांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ‘डायट’ मार्फत कार्यशाळा होेणार असून, आतापर्यंत दोन कार्यशाळा पार पडल्या आहेत.

बारावी उत्तीर्ण सेविकांना 6 महिने ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे, तर दहावी उत्तीर्ण सेविकांसाठी हा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. या अभ्यासक्रमात शिक्षणाचे तंत्र, अध्यापन कौशल्ये, खेळावर आधारित शिकवण्याच्या पद्धती यांचा समावेश असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, अंगणवाडीसेविकांची भूमिका केवळ देखरेख करणार्‍या व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नाही, तर त्या प्रत्यक्ष अध्यापन करणार्‍या शिक्षिकेप्रमाणे काम करणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे.
– सुलक्षणा ठोंबरे, जिल्हाध्यक्ष, अंगणवाडीसेविका संघटना

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago