1,152 शेतकरी बाधित, 482.70 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात रविवारी (दि. 29 मार्च) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सात गावांतील 482.70 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण 1,152 शेतकरी बाधित झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी 18 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे 247 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. सलग दोन वेळा झालेल्या या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या पावसात कांदा, कांदा रोपवाटिका, मका, गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे. पेरू व डाळिंब या फळबागांनाही फटका बसला आहे. नुकसानीत सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून, सुमारे 195 हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल 28 हेक्टरवरील कांदा रोपवाटिका, 122 हेक्टरवरील गहू व सुमारे 80 हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी मंगळवारीही (दि.31) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
नुकसानाचा तपशील
♦ एकूण बाधित क्षेत्र : 482.70 हेक्टर
♦ बाधित शेतकरी : 1,152 4कांदा : 195 हेक्टर
♦ गहू : 122 हेक्टर
♦ भाजीपाला : 80 हेक्टर
♦ कांदा रोपवाटिका : 28 हेक्टर
शेतकर्यांची मागणी
♦ तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
♦ पंचनामे जलद पूर्ण करावेत.
♦ पीकविमा दाव्यांची प्रक्रिया सुलभ करावी.
The district has been hit by unseasonal rains.