नाशिक : प्रतिनिधी
माजी आमदार वसंत गिते यांचे मुंबई नाका येथील कार्यालयाचे अतिक्रमण आज महापालिका अतिक्रमण विभागाने हटवले. सुट्टीचा दिवस असूनही कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
माजी आमदार वसंत गिते यांच्या कार्यालयावर अतिक्रमणची कारवाई, कार्यालयावर जेसीबी द्वारे कारवाइ केली. ,मुंबई नाका परिसरात वसंत गिते समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौंज फाटा तैनात करण्यात आला असून, राजकीय दबावातून कारवाई केल्याचा गिते यांचा आरोप आहे.