नाशिक

शिवजयंतीचा अपूर्व उत्साह

मिरवणुकीने वेधले लक्ष, शिवप्रेमींच्या गगनभेदी गर्जना

नाशिक : प्रतिनिधी
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय,’ ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष, डीजेचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि तरुणाईच्या अभूतपूर्व उत्साहपूर्ण वातावरणात गुरुवारी (दि.19) शहरात शिवजयंती मिरवणूक
पार पडली.
पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथून मिरवणुकीचा शुभारंभ सिंहस्थ कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान शिवचरित्रावर आधारित देखावे, शिवकालीन युद्धकौशल्यांचे सादरीकरण, युवक-युवतींच्या सांस्कृतिक पथकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळांनी सहभाग घेतला होता. रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी फुलांची उधळण करत मिरवणुकीचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकत, त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी लक्ष्मण सावजी, नगरसेवक मच्छिंद्र सानप, बबलू शेलार, आदिती पांडे, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार बाळासाहेब सानप, हरिभाऊ लोणारी, नीलेश शेलार, चेतन शेलार, रामसिंग बाबरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. जयंतीनिमित्ताने शहरात एकोपा, शिस्त आणि अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

छोटे रस्ते बंद

जुने नाशिकमधून मिरवणूक येणार असल्याने पोलिस प्रशासनाने मिरवणूक मार्गावरील छोटे रस्ते बंद केले होते. मिरवणूक मार्गात वाहनधारकांची गर्दी नको म्हणून ही खबरदारी घेण्यात आली.

येथून मार्गस्थ झाली मिरवणूक

चौकमंडईतील वाकडी बारव, जहांगीर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीज चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, वंदे मातरम् चौक, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोडवरून पुढे मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट गल्लीतून रविवार कारंजा, होळकर पुलावरून मालेगाव स्टॅण्डमार्गे पंचवटी कारंजा.

अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले. तब्बल अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

The extraordinary enthusiasm of Shiv Jayanti

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago