राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
नाशिक : प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत शहरातील प.सा नाट्यगृहात व कालिदास कलामंदिर येथे दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात नाटक होणार आहे. अंतिम फेरीत 40 नाटक सादर होणार आहेत. दिवसाला दोन नाटक सादर होणार आहेत. यंदा अंतिम फेरी नाशकात होत असल्याने रसिकांना विविध धाटणीचे नाटक पाहण्याचा आस्वाद घेता येणार आहे.जास्तीत जास्त रसिकांनी नाटकांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
1 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, निर्वासित (युथ फोरम, देवगड).
2 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, संगीत दहन आख्यान (व्यक्ती, पुणे)., रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, श्याम तुझी आवस इली रे (स्वराध्या फाउंडेशन, मालवण).
3 मार्च- दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, आपुलीचा वाद आपणाशी (सूर्यरत्न युथ फाउंडेशन, नायगाव, सातारा), रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, नात्यांचे गणित (सुहासिनी नाट्यधारा, महाड).
5 मार्च – सायंकाळी 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, मिशन व्हिक्टरी (श्री. विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई).
6 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, प्लाईंग राणी (श्री स्थानक बहुउद्देशीय संस्था, ठाणे). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, मएक रिकामी बाजूफ (श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, फोंडा).
7 मार्च- दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, बॅलन्स शीट (श्री जयोस्तुते मित्र मंडळ, कोल्हापूर).
8 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, अबीर गुलाल (शकुंतला सामाजिक सेवाभावी संस्था, लातूर).- रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, चांदणी (संवर्धन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नाशिक). 9 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, अर्यमा उवाच (समर्थ बहुउद्देशिय संस्था, एरंडोल, जि. जळगाव). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, तेरे मेरे सपने (समर्पित फाउंडेशन, सोलापूर).
10 मार्च – रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, इनफिल्ट्रेशन (रसरंग, उगवे). दुपारी 12 वाजता, प.सा. नाट्यगृह, एका उत्तराची कहाणी (रंगकर्मी प्रतिष्ठान, अहमदनगर). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, सखाराम बाईंडर (रामदास शेवाळे प्रतिष्ठान, कळंबोली).
12 मार्च – दुपारी 12 वाजता, प.सा. नाट्यगृह, र्हासपर्व (बेस्ट कला व क्रीडा मंडळ, मुंबई). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, जंगल जंगल बटा चला है (परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर).
13 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर,युद्ध अटळ आहे ?(नवक्रांती मित्रमंडळ, दहिवली). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, इश्क का परछा (नाट्यसेवा, नाशिक).
14 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, वार्ता वार्ता वाढे (नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, शमा(नटराज फाउंडेशन, सांगली).
15 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, वृंदावन (मराठी बाणा, चंद्रपूर). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, अचानक (लोकजागृती बहुउद्देशीय संस्था, शेकटा).
16 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, अंधार उजळण्यासाठी (गुलमोहर बहुउद्देशीय संस्था, नागपूर). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, दानव (गोपाला फाउंडेशन, परभणी).
17 मार्च – रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, नात्याची गोष्ट(चारकोप कल्चरल अँड स्पोर्टस् फाउंडेशन, मुंबई).
18 मार्च – दुपारी 12 वाजता, प.सा. नाट्यगृह,इव्होल्यूशन ए क्वेश्चन मार्क(बृहन्मुंबई पोलिस कल्याण, मुंबई).
20 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर,शीतयुद्ध सदानंद (बॉश फाईन आर्ट, नाशिक). रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, विसर्जन (बजाज ऑटो कला व क्रीडा विभाग, औरंगाबाद).
21 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, गटार (बहुजन रंगभूमी, नागपूर).
21 मार्च – रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, समांतर (अथ इति नाट्यकला प्रतिष्ठान, अमरावती).
22 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, फक्त एकदा वळून बघ(अश्वघोष आर्ट अँड कल्चर फोरम, मुंबई).
22 मार्च – रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, जात बोवारी (आनंदवन एज्युकेशन सोसायटी, पुणे).
23 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, रक्ताभिषेक (आनंदरंग कलामंच, सोलापूर).
23 मार्च – रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, गुलाबाची मस्तानी (आनंदी महिला संस्था, कल्याण).
24 मार्च – दुपारी 4 वाजता, कालिदास नाट्यमंदिर, गांधी विरुद्ध गांधी (अंबापेठ क्लब, अमरावती).
23 मार्च – रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, बझर (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण शाखा).
25 मार्च – दुपारी 12 वाजता, प.सा. नाट्यगृह, मोक्षदाह(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा).
26 मार्च – रात्री 8 वाजता, प.सा. नाट्यगृह, म्हातारा पाऊस (अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघ).