वन खात्याला जाग आली




ञ्यंबकेश्वर:

ञ्यंबकेश्वर शहराच्या नजीक असलेल्या पिंपळद येथे गुरूवारी सायंकाळी बिबटयाच्या हल्ल्यात लहान मुलगी ठार झाली व त्यानंतर वन खात्याला जाग आली.मागच्या काही महिन्यांपासून बिबटया पिंपळद आणि पंचक्रोशीत दर्शन देत आहे.सप्टेंबर 2022 च्या दरम्यान दुगारवाडी येथे दोन वेळा लहान मुलांवर हल्ला झाला.त्यानंतर धुमोडी,वेळूंजे आणि मागच्या काही दिवसांपूर्वी ब्राह्मणवाडे येथे घराच्या दरवाजातुन लहान मुलांना उचलले.काल गुरवारच्या घटनेत तर मोठी बहिण सोबत असतांना मागच्या मागे लहान मुलीवर झडप घातली.या प्रकाराने तालुका हादरला आहे.वनखात्याच्या कार्यालयास टाळे ठोकण्याची भाषा सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी बोलत आहेत.

गुरुवारी पिंपळद शिवारात घटनेच्या तासभरात वनखात्याची यंत्रणा हालली आणि तातडीने पिंजरे रवाना करण्यात आले.शुक्रवारी दुपार पर्यंत पिपंळद शिवारात वन खात्याच्या कर्मचा-यांनी छावणीचे स्वरूप आणले होते.वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाच्या सहा व्यक्ती येथे दाखल झाल्या होत्या.त्यांच्या सोबत कर्मचा-यांचा मोठा फौजफाटा देखील होता.घटना घडली तेथे एक पिंजरा ठेवण्यात आला आहे.त्या व्यतिरिक्त आणखी पाच पिंजरे जागोजाग ठेवण्यात आले आहे.

दुपारी ड्रोन कॅमेरा आणला होता.त्या अधारे संपुर्ण पंचक्रोशीचे स्कॅनींग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.तसेच घटनेच्या परिसरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारात प्राण्यांची होणारी हालचाल टिपण्याची क्षमता त्यांच्यात आहे.दोन डार्ट गन धारी येथे तैनात करण्यात आले आहेत.बिबटया दिसताच त्याला बेशुध्द करण्यात येईल.

दरम्यान नदी खो-यांमध्ये पकडलेले बिबटे वनखाते ब्रह्मगिरी परिसरात आणून सोडतात.मात्र त्यांना भक्ष म्हणून असलेले वन्यजीव नामशेष झाले आहेत.जंगल शिल्लक राहीलेले नाही.मोठया प्रमाणात बांधकाम आणि उत्खनन,सपाटीकरण झालेले आहे.त्यामुळे बिबटयांना आणि अन्य वन्यजीवांना निवारा राहीलेला नाही.तशात मानवी वस्तीकडे बिबटे कोबंडया कुत्री यासाठी येत असतात.वनखात्याने प्रथम तृणभक्षी वन्यजीव उपज वाढविण्यासाठी प्रयत्न करणे,महसुल विभागाने रानावनात बांधकाम,सपाटीकरण यासाठी बंधने घालणे,वनखात्याच्या जमीनी लगत असलेल्या खासगी जमींनीसाठी बिगरशेती करणे,सपाटीकरण,बांधकाम,उत्खनन यावर कठोर निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणने आहे.

बिबट्याचा धसका घेतलेल्या गावोगावच्या ग्रामस्थांनी रानोमाळ गवत पेटवण्याचा धडाका सुरू केला आहे.त्यामुळे सर्वत्र धूर दिसत आहे.तसेच रात्रीच्या वेळेस आगीने वेढलेले शिवार नजरेस येत आहे.बिबट्या पासून संरक्षण करण्याचा उपाय लोकांनी आपल्या परीने योजला आहे.मात्र त्यामुळे वणवा लागत असून वनस्पती वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.

ञ्यंबकेश्वर शहरात बिल्वतीर्थ तलाव आणि निलपर्वत परिसरात बिबटयाचा वावर वाढला आहे.याबाबत ञय्ंबकेश्वर परिक्षेत्र वनखाते आणि ञ्यंबक नगर पालिका यांना कळवले आहे.मात्र अद्याप पर्यंत त्याकडे लक्ष दिलेले नाही.नगर पालिकेने निलपर्वत आणि बिल्वतिर्थ रिंगरोड परिसरातील बंद असलेले पथदीप सुरू करावेत अशी वारंवार मागणी करण्यात आली आहे.मात्र प्रशासनाने त्याबाबत दुर्लक्ष केले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

5 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

2 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

2 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

2 days ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 days ago