लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा
मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. त्यामुळे लाडक्या बहिणी काहीशा नाराज झाल्या होत्या. त्यातच केवायसी करताना अनेक अडचणी येत होत्या. शिवाय निवडणूक संपल्यानंतर सरकारने अनेक महिलांना या योजनेतून वगळले होते. त्यामुळे मोठी नाराजी निर्माण झाली होती. विरोधक सुध्दा टीका करत होते. परंतु
आता सरकारने ई-केवायसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.महायुती सरकारने भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे. सुमारे ७० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. परंतु आता महायुती सरकारने ई-केवायसीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांनी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तसेच नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत लाडक्या बहिणीच्या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून हा निर्णय तात्पुरता रद्द केला असल्याचे बोललं जातं आहे.
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर गोळीबार आणि अंबड येथील बंगला खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी निखिलकुमार…