राधाकृष्ण नगरात स्वयंघोषित भाईचा राडा

राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा

गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत

सातपूर : सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील राधाकृष्णनगर मध्ये ऐन दीपावलीच्या दिवशी परप्रांतीय स्वयंघोषित भाईने व त्याच्या बहीणेने फटाके वाजवण्याच्या क्षुल्लक करणावरून गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ करत दहशत माजवून सातपूर पोलिसांना आव्हान दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वयंघोषित भाई आकाश पांडे व त्याची बहीण हे     दुसऱ्याच्या दारात मोठ्या आवाजाचे फटाके फोडत होते.  तृप्ती संदीप पोखरकर रा. राधाकृष्णनगर यांच्या घरात लहान बालक असल्याने मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नका असे आकाश पांडे व त्याच्या बहिणीला सांगितले. यांचा राग येऊन आकाश पांडे याने शिवीगाळ करत संपूर्ण गल्लीला पेटवून देऊ, कापून टाकू अशी धमकी देत दहशत निर्माण केली. याबाबत पोखरकर यांनी सातपूर पोलीस स्टेश मध्ये तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिसांनी संशयित भाईवर गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांना व नागरिकांना आव्हान देणाऱ्या संशयित भाईवर सातपूर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago