तलवारीचा नंगानाच करून दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या पंटरच्या आवळल्या मुसक्या

तलवारीचा नंगानाच करून दहशत पसरविणाऱ्या
स्वयंघोषित भाईच्या पंटरच्या आवळल्या मुसक्या :
म्हसरूळ गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी : वार्ताहर
म्हसरूळ गावातील पान टपरीवर राडा करून दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या दोन पंटरांच्या मुसक्या आवळण्यात म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयितांकडून दोन तलवारी, एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
म्हसरूळ येथील बस स्टॉप येथे भूषण देशमुख (वय ३१, मार्गारेट टॉवर, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड) यांचे गणेश पान स्टॉल आहे. मंगळवारी ता.२५ रोजी सायंकाळी सहा वाजता भुषणचा भाऊ पान स्टॉलवर असताना युवराज सोनवणे नामक व्यक्तीच्या नावाने तीन चार तंबाखू च्या पुड्या मागितल्या होत्या. त्यावेळी हर्षल याने बाहेर असलेला भाऊ भूषण यास फोन करून याबाबत सांगितले, यावर चिडून चार पुड्या नाही पुडा च दे असा बोलला. रात्री आठ वाजता भूषण देशमुख हा स्वतः पान स्टॉलवर असताना दोन संशयितांनी तलवारी घेऊन दहशत निर्माण करत काऊंटरवर आपटली आणि तु बाहेर ये तुझा गेम करून टाकतो, युवराज भाईला शिव्या देतो असे म्हणत पान स्टॉलचे नुकसान करून फरार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने या घटनेतील दोन्ही संशयित तवली फाटा येथे लपून असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने म्हसरूळ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयित वैभव रामचंद्र शेवरे (वय २२ ), व सिध्दार्थ उर्फ सिध्दू पुंजाराम वाघ (वय २२) दोघे रा. म्हसोबावाडी, दिंडोरीरोड, म्हसरूळ, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक पटारे, उध्दव हाके, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, सतिष वसावे, कविश्वर खराटे, देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, पोलिस अंमलदार प्रशांत देवरे, गिरीधर भुसारे, गुणवंत गायकवाड, पंकज महाले यांनी केली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

4 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

4 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

14 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago