आस्वाद

जीवनातील आनंदाचं दडलेले रहस्य – गुपित आनंदाचं !

मानवी जीवनात आनंद म्हणजे सुखाचा प्रत्यय, जेथे सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तेथे आनंद ओसंडून वाहत असतो म्हणूनच संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की- आनंदाचे डोही आनंद तरंग तर एका कवीने म्हटले आहे की, आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. हा आनंद घेत असताना काही गुपितं असतात, प्रत्येकालाच आनंद मिळेलच असेही नाही, काही काही व्यक्तीना आयुष्यभर कितीही प्रयत्न केला तरी जीवनात आनंद मिळत नाही, तर काय आहे या आनंदाचे गुपित? जर आपल्याला आनंदाचे गुपित शोधायचे असेल तर डॉ. मोहन खडसे लिखित गुपित आनंदाचे हा ललित लेख संग्रह वाचला पाहिजे.
डॉ. मोहन खडसे लिखित गुपित आनंदाचं! हा ललित लेख संग्रह नुकताच वाचनात आला. या कलाकृतीच्या मुखपृष्ठाकडे पाहिले आणि नकळत गालावर हसू पसरले, कारण या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर काही तबकड्या उतरंड करून ठेवल्या आहेत, सर्वात खालची पसरट तबकडी तिला तीन उभ्या रेषा, त्यावर अंडाकृती तबकडी तिला दहा ठिपके असून, त्यावर एक लंबाकार चकती ठेवली असून तिला दोन्ही बाजूने दोन दोन रेषा आणि सर्वात वर बोटात धरून एक मानवी हसरा चेहरा वरच्या तबकडीवर समतोल करून ठेवताना दाखवला आहे. अत्यंत अर्थपूर्ण असेहे मुखपृष्ठ मानवी जीवनातील अनेक गुपितांची उकल करतांना जाणवतात. त्यातून मानवी जीवनातल्या आनंदाचं गुपित दडलेले आहे.
गुपित आनंदाचं! या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील सर्वात खालची पसरट तबकडी तिला तीन उभ्या रेषा आहेत, या रेषा काय सांगतात? यातून आनंदाचं कोणतं गुपित दडलं आहे? हा विचार करणे महत्त्वाचे आहे. माणसाला आयुष्यात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तीन काळ अनुभवावे लागतात अशावेळी काळाची पावलं कुणासाठी थांबत नाही आणि ती कुणासाठी कशी फिरतील तेही सांगता येत नाही मात्र माणसाच्या सुखदुःखाची कारणं काळानुसार बदलत जातात. समन्वय महत्त्वाचाच! या लेखात लेखक लिहितात की- एखाद्या विषयासाठी प्रत्येकाला सारखीच संधी मिळत नसते कधी कधी संधी मिळालीही तरी त्याला पकडण्याचं शहाणपण आणि अमाप प्रयत्नांची जोड मिळत नाही, प्रत्येक काळात माणसं त्यावर उपाय शोधतात , काहीना ते जमतं, जी माणसं याला जाणतात ती समाधानी होत, आहे त्या स्थितीत फुलण्याची धडपड करतात. अशीच स्थिती व्यक्त करतांना लेखकाने प्रसिद्ध शायर हस्तीमल हस्ती यांचा हिंदी शेर मांडला आहे-
अनगिनत बूंदो में कुछ को ही,
आता है फुलों पे ठहरना
गुपित आनंदाचं ! या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील मधल्या अंडाकृती तबकडीला दहा ठिपके दाखवले आहेत, यातून मानवी जीवनातील काही बाबी अधोरेखित करून त्यातून आनंदाचं गुपित खोलले आहे. माणसाच्या आयुष्यात दहा गोष्टीना अति महत्व दिले गेले आहे. वाचा, वाणी, श्रवण, स्पर्श, कर्म, वागणं, नजर, चालणं, राहणं, असणं अशा दहा गोष्टीचं समतोल करून समाजात राहिले तर आनंद घेता येतो. समाजात आपली वाचा कशी आहे, आपली वाणी मधुर असायाला हवी, आपण नेहमी चांगले ऐकले पाहिजे, आपल्या स्पर्शात प्रेम हवे, आपण समाजासाठी चांगले काम केले पाहिजे, समाजात कसं वागतो, आपली नजर नम्र हवी, आपलं चालणं, आपलं राहणीमान योग्य असावं आणि सर्वात महत्वाचं आपलं अस्तित्व स्वतः निर्माण करणं या दहा गोष्टिंचा समन्वय साधला, समतोल राखला तरच आपल्या आयुष्यात आनंद घेता येतो हे अधोरेखित करण्यासाठी तबकडीवर दहा ठिपके दिले असावे असे मला वाटते. आणि म्हणूनच लेखकाने नियंत्रण महत्वाचेच.. ! यातून सौम्य अन् मृदू शब्द अन् स्वराचा वापर करणेचा संदेश दिला आहे तर अफवा घातकच..!
या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील वरच्या लंबाकार तबकडीला दोन्ही बाजूने दोन दोन रेषा दाखवल्या आहेत, दोन टोकाच्या दोन दोन रेषा माणसाच्या आयुष्याच्या आनंदाचं गुपित खोलणार्‍या आहेत. माणसाच्या आयुष्याच्या चार अवस्था आहेत, बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा चार अवस्थांमध्ये माणसाचे जीवन गुंफले गेले आहे. माणूस असो वा प्राणी प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत स्वतःबरोबरच इतरांना संतुलित ठेवावे लागते. आपल्या आजूबाजूला घटना घडत असतांना आपण त्यात स्वतःला किती संतुलित ठेवतो यावर आपल्या मनाचा आनंद अवलंबून असतो. लेखकाने मुखपृष्ठावरील उतरंडीवर ठेवलेल्या विविध आकाराच्या, विविध अर्थाने परिपूर्ण असलेल्या आणि एकमेकांचा समतोल राखणार्‍या तबकड्यातून हाच अर्थ अभिप्रेत केला आहे आणि म्हणूनच संतुलन आणि समन्वय या लेखातून आनंदाचं गुपित खोलले आहे. या कलाकृतीतील अक्षरवैभवात भर टाकणार्‍या 51 लेखातून लेखकाने आनंदाचं गुपित खोलण्याचा केलेला प्रयत्न वाचकांच्या नजरेत आणून देण्यासाठी पुण्याचे मधुश्री प्रकाशन यांनी या कलाकृतीला प्रकाशित करून वाचकांच्या हवाली केले आहे. ही कलाकृती स्वातंत्र्यसैनिक विष्णू खडसे, सावित्रीबाई खडसे आणि पारिवारिक सदस्यांना अर्पण केली आहे. मुखपृष्ठचित्रकार सुधर्म कुलकर्णी यांच्या अभिनव कल्पकतेतून साकारलेल्या कलाकृतीला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे, तर ज्येेष्ठ साहित्यिक मोगल जाधव यांनी शुभेच्छा देऊन कलाकृतीच्या साहित्यिक मूल्यांना एक वेगळा आयाम दिला आहे.

The hidden secret of happiness in life – the secret of happiness!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago