नाशिक

वरखेडा आरोग्य केंद्रात जखमीचा उपचाराअभावी मृत्यू

केंद्रास लावले कुलूप; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

दिंडोरी ः प्रतिनिधी
वरखेडा (ता. दिंडोरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघात झालेल्या जखमी व्यक्तीवर उपचारात
हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी आरोग्य केंद्रास कुलूप लावून निषेध व्यक्त केला. संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी, फकिरा भिका कासे (वय 42, रा.जानोरी, ता. दिंडोरी) हे दुचाकीने (एमएच 15, 9036) जात असताना वरखेडा गावाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून त्यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकारी लखमापूरला गेल्याची माहिती मिळाली. दोन पारिचारिका उपस्थित होत्या. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. खोकले यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून सरपंच केशव वागले यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली. रुग्णवाहिकेचा चालक गावी गेला असून, गाडीची चावीही घेऊन गेल्याचे समजले. याबाबत जागृत नागरिकांनी तालुका आरोग्याधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. तासभर वाट पाहूनही रुग्णवाहिका आली नाही. दरम्यान, डॉ. खोकले प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. तोपर्यंत फकिरा कासे यांची प्रकृती अधिकच खालावली होती. उपचारासाठी उशीर झाला. अधिक उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे वेळेत उपचार न झालेल्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला. स्थानिकांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना गराडा घालून जाब विचाराला; परंतु त्यावेळी वणी पोलिस घटनास्थळी आले. स्थानिक सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व नातेवाइकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप लावून निषेध व्यक्त केला.

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड
वरखडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत.

तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना,

एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला.

परंतु, भोंगळ कारभारात निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याने

संताप व्यक्त होत आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांवर काय कारवाई होते,

याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

1 day ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

1 day ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

1 day ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

1 day ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

1 day ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

1 day ago