शहराच्या विविध भागात होतेय विक्री
नाशिक :अश्विनी पांडे
पावसाळ्याला सुरूवात झाली जिल्हयाच्या अदिवासी भागातून रानभाज्या विक्रीसाठी येत असतात. ग्राहकही वर्षभर फळ भाज्या अणि पालेभाज्या खाऊन कंटाळलेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात रानभाज्या विक्रीसाठी आल्यानंतर नागरिकही रानभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवीच्या रानभाज्यांना वेगळ्या चवीच्या असतात. यांतील अनेक भाज्या जंगलात आणि विशेषता अभयारण्य परिसरात वावरणारे लोक वनौषधी म्हणून वापरत होते.
रानभाज्या या आरोग्यदायी असतात. सध्या काही भागात पावासामुळे शेतीचे नुकसान झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाला चांगलाच महागला आहे. 80 ते 100 रूपये किलो पर्यंत भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे नागरिक 30 ते 40 रूपये किलोने विकल्या जाणार्या रानभाज्यांना अधिक पसंती देत आहे. आरोग्यदृष्ट्या शरीरासाठी पोषक असणार्या भाज्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. शहरात त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा भागातून रानभाज्या विक्रीसाठी येतात. यात आकर्या, उळसा, करटूले, कोळू, कांचन, रानतेरा, आंबटवेल, दिंड, माठभाजी, करडू, आंबड अशा अनेक रानभाज्यांनी मागणी वाढली आहे. पावसाळ्यात रानभाज्या विक्रीसाठी असतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधीगुणधर्माची जाण असणारे ग्राहक आवर्जून रानभाज्या घेतात. रानभाज्यांना महत्त्व यावे आणि ग्राहकांना भाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी रानभाज्या महोत्सव ही भरवण्यात येतात.
या सर्व भाज्या करण्यासाठी अगदी सोप्प्या आणि खायला रुचकर असतात. नैसर्गिक पद्धतीने उगवल्याने त्या आरोग्यासही चांगल्या असतात. त्यामुळे पावसाळ्या बरोबर येणारा हा रानमेवा अधिक लोकप्रिय होत आहेत.