नाशिक

कमळ पक्ष्याची जून-सप्टेंबरऐवजी एप्रिलमध्येच वीण

कमळ पक्ष्याची जून-सप्टेंबरऐवजी एप्रिलमध्येच वीण

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर या वन्यजीव अभयारण्यात विविध प्रकारचे स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी, जलवनस्पती, जलचर जीव आणि समृद्ध जैवविविधतेमुळे या परिसराला ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणूनही ओळखले जाते. अशा या जैवविविधतेने समृद्ध परिसरात पक्षीनिरीक्षणादरम्यान एक महत्त्वपूर्ण आणि अभ्यासात्मक निरीक्षण समोर आले असून ते भविष्यातील पक्षीशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते.
गेली अनेक वर्ष या परिसरात पक्ष्यांचा अभ्यास करणारे पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी नांदूरमध्यमेश्वर परिसरात निरीक्षण करत असताना मराठीमध्ये कमळ पक्षी म्हणून ओळखल्या जाणार्‍या फिजंट-टेल जाकाना या पक्ष्याच्या प्रजननवर्तनामध्ये संभाव्य बदल नोंदवला आहे.
अनेक पक्षी प्रजाती हवामानातील बदलांनुसार
स्वतःचे जीवनचक्र समायोजित करत असल्याचे जागतिक संशोधनातूनही स्पष्ट झाले आहे. पक्ष्यांचे स्थलांतर, प्रजनन कालावधी, अन्न शोधण्याची पद्धत आणि अधिवास निवड यामध्ये सूक्ष्म बदल दिसून येत आहेत. नांदूरमध्यमेश्वरातील हे निरीक्षण अशाच प्रकारच्या बदलांशी संबंधित असण्याची शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात कमळ पक्ष्याच्या घरटे निवडीत आणि प्रजनन कालावधीत दिसलेले हे निरीक्षण प्राथमिक स्वरूपाचे असले, तरी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा निरीक्षणांचे दीर्घकालीन दस्तऐवजीकरण झाल्यास भविष्यातील संशोधनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पर्यावरणीय बदलांचा पक्ष्यांच्या जीवनशैलीवर नेमका कसा परिणाम होत आहे, यासाठी अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे. निसर्गातील बदल अनेकदा शांतपणे घडत असतात. त्या बदलांची नोंद घेणारी सजग निरीक्षणेच भविष्यातील पर्यावरणीय अभ्यासाची दिशा ठरवतात.
– प्रा. आनंद बोरा, पक्षी अभ्यासक

The lotus bird mates in April instead of June-September.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

8 minutes ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…

14 minutes ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्‍या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…

18 minutes ago

गोदाकाठी सामूहिक शंखनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…

28 minutes ago

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago