नाशिक

सिडको प्रभाग समितीची सभा लांबणीवर

गैरकारभारावर संताप, कार्यालयात आवश्यक आसनव्यवस्था नाही

सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सिडको प्रभागात प्रशासनाचा गैरकारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सभापती निवडून महिनाभर उलटूनही प्रभाग कार्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. प्रभाग समितीच्या सभागृहात सदस्यांना बसण्यासाठी आसनव्यवस्था नसल्याने मासिक सभाच रद्द करण्याची वेळ आली. नागरी समस्यांचा डोंगर वाढत असताना नागरिकांतून प्रशासनावर टीका होत आहे.
सिडको तथा नवीन नाशिकच्या सिडको प्रभागात सध्या गैरकारभाराचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण आणि पथदिव्यांच्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असताना त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आवश्यक असलेली मासिक सभाच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होऊ शकली नाही. कारण काय तर सदस्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नव्हती.
नवनिर्वाचित सभापती बाळकृष्ण शिरसाठ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सभापती दालनाची दुरवस्था समोर आली. प्रभाग समितीच्या सभापतींना भेटण्यासाठी येणार्‍या लोकांसाठी साधी बैठक व्यवस्थादेखील नसल्याने ‘कारभार मोठा, पण व्यवस्था तोकडी’ अशी भावना व्यक्त होत आहे.
अडगळीत पडलेल्या दालनातूनच सभापतींनी कामकाज सुरू केले. मात्रस प्रशासनाचा सुस्तपणा कायम असल्याने आठ दिवस उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
प्रभागाच्या मासिक बैठकीसाठी सभागृहाची तयारी करण्यात आली, पण तेथेही सदस्यांना बसण्यासाठी आवश्यक आसन व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रभाग समितीची मासिक बैठकदेखील होऊ शकली नाही. त्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा प्रश्न आणखी लांबणीवर पडला. सदस्यांनी वेळोवेळी बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून सिडको प्रभागातील रखडलेली मासिक सभा तातडीने घेण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे पहिले प्राधान्य आहे. आवश्यक सुविधा लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट करत आपले कामकाज सुरूच ठेवणार आहे
-बाळकृष्ण शिरसाठ, सभापती, सिडको प्रभाग समिती

CIDCO Ward Committee meeting postponed

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

5 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

11 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

24 minutes ago

रखडलेला व्यापार करार

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…

32 minutes ago

सप्तशृंगगडावर छबीना उत्सव साजरा

कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्‍याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…

42 minutes ago

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…

49 minutes ago