मन हे आपल्या शरीरातला महत्त्वाचा घटक आहे. कधीकधी मनावर खूप स्पंदने येतात. तेव्हा मन खूप उदास होते. आपल्या मनावर जे आघात झालेले असतात ते कुणाला तरी सांगावं, आपलं मन मोकळं करावं, असे नेहमी आपल्याला वाटते.
तेव्हा प्रत्येकाने आपल मन आपल्या जवळच्या व्यक्तीकडे मोकळं केलं पाहिजे. मनावरचा भार कमी करून आपलं मन अगदी कपाटासारखे प्रत्येकाने आपलं मन सावरायला, नीटनेटके आवरायला घेतले पाहिजे. आपल्या मनातले दुःख कपड्यांसारखे झटकले पाहिजेत. आपलं मन आपल्या जवळच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे मोकळं केलं पाहिजे. त्यामुळे मनावरचा भार हलका होऊन हृदयावरचे स्पंदने दूर होतात. मनाला हलकं वाटायला लागतं. मनावरचे दडपण कमी होऊन एक ओझे कमी झाल्यासारखे वाटते. मन हलकं झाले की मनाला उंच भरारी घ्यावी वाटते. अर्थात, मन खूप आनंदी राहते म्हणून एकदा तरी प्रत्येकाने मन आवरायला घ्या. मनाला सावरायला घ्या. एकदा का मन आवरलं की ते आपोआपच सावरतं बघा. मन आवरल्याने, सावरल्याने हार्ट ब्लॉकेजेस मोकळे झाल्यासारखे समाधान मिळते. मन वार्‍यासारखं उडायला लागत. मनालाही मन, भावना,अश्रू, स्पंदने एकांत, विरह हे सगळे लय असतात. या सर्वांतून गरुडसारखी आकाशात झेप घ्यावी, असे मनाला नेहमी नेहमी वाटतं. म्हणून प्रत्येकाने आपलं मन कपाटासारखं आवरायला घ्या आणि उंच आकाशात गरुडझेप घ्यायला शिका. मनाला बुरशी येणार्‍या विचारात रेंगाळण्यापेक्षा मनाला सुंदर उत्साहित विचारांनी प्रलोभित करा. मनाला या सुंदरतेन सावरायला शिका. मग बघा या सुंदरतेचे तेज तुमच्या चेहर्‍यावर दिसतं आणि तुमचा चेहरा त्या तेजाने अधिकाधिक चमकायला लागतो. हेच खरं मनातलं आतलं सौंदर्य असते. ते आपण शोधले पाहिजे. निरखले पाहिजे. स्वतःला या सुंदरतेत सुशोभित केले पाहिजे. मन कसे आवरावे हे मी आता सांगते. मन हेसुद्धा एका कपाटासारखं असते. आपल्या मनाला एक कपाटासारखा चोरकप्पा असतो. कपाटात जसे कपड्यांचे ओझे असते तसे मनावरही वारंवार आघात होऊन दडपणनाचे ओझे झालेले असते. त्या ओझ्याने मन कसे गच्च कपाटासारखे भरून जाते आणि आपल्या सर्वांना एक वेगळे फिलिंग्ज जाणवते उदासीनतेचे, दडपणाचे, कधीकधी,
सुख-दुःखात गुदमरल्यासारखं होतं. आतल्या आत श्वास कोंडतो, जीव गुदमरतो. जेव्हा जेव्हा असे आपल्याकडे असे फिलिंग जाणवतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने हे मनावरचे ओझे मोकळे केले पाहिजे. आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीकडे मन आवरायला घ्या. कपड्यासारखे मनावरचे ओझे झटकून टाका. जेव्हा आपण मन मोकळे करतो तेव्हा मनसुद्धा निरभ्र आकाशासारखे धुतल्यासारखे होते. आणि मनावरचा भार, ओझे, जडत्व कमी होऊन मनाला हलके हलके स्पंदने येऊ लागतात. आणि आपले मन जसे कपाट आवरून नीटनेटके दिसते तसे मन आवरल्यावर निर्मळ साफ होते. मनावरचा काचरा शब्दातून वाहून गेला की त्यामुळे शरीरस्वास्थ्य टिकून राहते. मन एका फुलपाखरासारखे कोमल असते. त्यालाही प्रेमाची गरज असते. जसे आपण फुलपाखराला इजा होऊ नये म्हणून फुलपाखरावरून अलगद आपण कोमलतेने हात फिरवतो बघा. तसेच आपल्या मनाचे असते. म्हणालाही प्रेमाची, आपुलकीची, मायेची गरज असते. आपल्या मानवरही प्रेमाची फुंकर घाला, मनाला सावरा, मनावरही प्रेम करा. मनावर प्रेम केले म्हणजे प्रत्येकाने स्वतःवरही प्रेम करावे. स्वतःसाठी जगावे. मित्र-मैत्रिणींनो आपले आयुष्यातले क्षण अलगद वार्‍यासारखे कधी उडून जातात आणि आपले आयुष्य कधी संपते ते आपल्याला कळतच नाही. संसाराच्या रणगाड्यात आपण स्वतःला विसरतो आणि स्वतःसाठी जगायचेच राहून जाते. म्हणून
स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला सावरा, स्वतःला आवरा आणि जसे आपण सर्वांमध्ये उठून दिसावे म्हणून स्वतःला नटवतो, सजवतो तेव्हा आपण छान दिसतो बघा. तसेच मनालाही सुंदर विचारांचे प्रलोभनातून मनाला सजवा, नटवा, उच्च विचारांचे जाळे विणून दुसर्‍यांना घडवा. एका निराधाराला आधार द्या. आपल्या मनात दुसरा कप्पा म्हणजे एक वाईट मनपण असते. ते कसे ते मी सांगते. एखाद्याला दुसर्‍यांना हरवण्यात अघोरी सुख वाटते. हा काय अघोरी आनंद दुसर्‍यांना नेहमी हरवण्यात कसली हो तुमची जीत, ती तर तुमची हार असते. मी तर म्हणेन दुसर्‍याला हरवणे हा एक मूर्खपणाचा कळस असतो. मी तर अशा व्यक्तींना षंड म्हणेन. एकमेकांची खेचाखेच करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा. मग आपोआपच तुम्हाला तुमची लायकी कळते. आणि या हार आणि जीत या खेळात आपला वेळ घालवणे म्हणजे केवळ मूर्खपणाच म्हणेन. मी त्याला. यामागे मूर्खाची झुंड असते तेव्हाच असे षंड निर्माण होतात. जेव्हा तुम्ही सत्याला त्रास देतात तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात कमी पडलेले असतात म्हणून हा मार्ग निवडून तुम्ही एकप्रकारे स्वतःलाच हरवतात. हीच खरी तुमची हार असते आणि अशा खोट्या चक्रव्हूवात अडकून तुम्ही स्वतःलाच फसवतात. सत्य उशिरा का होईना जिकंतेच. अशा मनाच्या दोन बाजू मी मांडल्यात मित्रांनो. असोत मनाला नेहमी अशा वाईट लोकांच्या कळसूत्री विचारांपासून दूर ठेवा. त्यात आपला वेळ आणि आयुष्य दोन्ही वाया जाते आणि आयुष्याची संध्याकाळ कधी येऊन ठेपते ते कळत नाही. आयुष्याचे शेवटचे पान येण्याच्या आत माझा लेख वाचून मनाला सावरा. स्वतःला आवरा. मग स्वतःला सुंदर विचारांनी तर सावराच, पण सुंदर वेशभूषा परिधान करूनही स्वतःला जगवा. त्यामुळे मन आणि तन दोन्ही सुंदर राहतात. निराधाराला आधार द्या, भुकेलेल्याला जेवण द्या, हरलेल्याला पुढे जाण्याची ताकद द्या. मनुष्य देवळात पाय झिजवून देवपण शोधून काय सिद्ध करतो. एकीकडे देवाची पूजा करायची आणि दुसरीकडे प्रामाणिक माणसाला त्रास देऊन छळणे यात कसले हो देवपण. खर्‍या माणसातला देव शोधा. माणसातली माणुसकी जपा, वाईट शब्दाकोशानेे हिणवणे, दुःखाने दुखावणे टाळा. माणसातला खरा माणूस जपा, हेच खरे देवपण. अशा प्रकारे मित्रांनो मी माझे मन तुमच्याकडे या लेखणीतून मांडले. यात काही चुकले असेल तर माफ करा. पण आपण मनाच्या सगळ्या बाजू अशा प्रकारे मांडून आपले मन स्वच्छ, निर्मळ, कोमल, शीतल बनवा. स्वतःला उच्च सुंदर विचारांनी उत्साहित करा आणि जगण्याचा आनंद घ्या. आपले मन मोकळे करून आकाशात उंच उंच गरुडझेप घ्यायला शिका. मग बघा मोकळं मन मोकळ्या आकाशासारखं कसं स्वच्छ वाटतं. आपण मोकळा श्वास घेतो आणि आपलं मन पक्ष्यांंसारखे आकाशात उंच भरारी घेत. मन मोकळं केल्यानंतरची आपली गरुडझेप आपल्या आयुष्याला वेगळी दिशा देते आणि आपल्या आयुष्याच शेवटचं पान कसं हिरवंगार बनतंय बघा. जीवनाची खरी संध्याकाळ दुसर्‍यांना देण्यात आहे म्हणून देण्यातला आनंद शोधा. जीवन जगताना दुसर्‍याला आधार देऊन त्याला जीवन जगण्याचे दान द्या. तुमच्या कोमल शब्दाचा आधार द्या. तुमची कोमलतेची, मायेची, आधाराची फुंकर दुसर्‍याच्या जीवनाला नवीन आकार येऊन त्याचे सुंदर आयुष्य घडवू शकते.

the mind

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

10 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

11 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

11 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

11 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

11 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

11 hours ago