नाशिक

नशेची क्षणिक मजा आयुष्याला सजा

नाशिक ः
देवयानी सोनार
सुरुवातीला वेगळे थ्रील म्हणून केली जाणारी नशा नंतर व्यसनात रूपांतरीत होत जाते आणि लागलेले हे व्यसन नंतर सुटता सुटत नाही. क्षणभराची ही नशा नंतर संपूर्ण आयुष्यभरासाठी एकप्रकारची शिक्षा बनून जात असल्याचे चित्र आहे.
व्यसन लागण्यासाठी अनेकदा आसपासची परिस्थिती, संगत, इतरही अनेक कारणे असतात. आयुष्यात कठीण प्रसंगी, कामाच्या ठिकाणी ताणाचे नियोजन न करता आल्याने, वैवाहिक, खासगी आयुष्य, व्यंग, शारीरिक कमतरता, आत्मविश्‍वासाची कमी असे एक ना अनेक कारणे व्यसनांकडे वळलेल्या लोकांची असतात. व्यसनांची सवय ही शाळा किंवा कॉलेजपासून लागण्याची शक्यता जास्त असते. मित्रांबरोबर काही नवीन गोष्टी करून बघाव्यात या उत्सुकतेने किंवा नैराश्यामुळे या वयामध्ये व्यसनाच्या आहारी व्यक्ती जाऊ शकतात.
तंबाखू, मशेरी, गुटख्यासारखे व्यसन तासन्तास तंद्री लागत असल्याचे कारणे व्यसनाधीन व्यक्‍तींकडून सांगितले जाते. नशेची क्षणिक मजा आयुष्याची सजा हमखास मिळते. नशेमुळे आरोग्याच्या तक्रारी अनेकदा तर आयुष्य उद्ध्वस्त होत असूनही अनेकजण त्याकडे कानाडोळा करतात. डोळ्यादेखत उदाहरणे घडत असूनही कळतंय पण वळत नाही. आणि व्यसनापासून दूर हटले जात नाही. बाजारात तंबाखू, दारू सोडवा आदी व्ससने दूर करण्यासाठी औषधे उपलब्ध असूनही त्याचा वापर किती केला जातो, हा संशोधनाचा विषय आहे.
व्यक्‍तीची आंतरिक इच्छा आणि प्रयत्न व्यसनापासून मुक्‍त करू शकत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
शहर आणि ग्रामीण भागात सर्रास तंबाखू, गुटखा, मशेरीसह दारू, नशा आणणारे व्यसन करण्याचे प्रमाण जास्त आहे.सहज आणि परवडणार्‍या किमतीत उपलब्ध होत असल्याने व्यसनाधीन वाढीला पोषक वातावरण मिळत आहे.

काय करावे?
विशेषत: तरुणांमध्ये याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने समाजावर आलेले हे संकट रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि पालक यांची भूमिका महत्त्वाची आहे. शाळांमधून आणि महाविद्यालयांमधून नियमित स्वरूपात व्यसनांबद्दल चर्चा संवाद करणे गरजेचे आहे. त्यापासून दूर राहणे कसे महत्त्वाचे आहे, व्यसनांचे दुष्परिणाम काय, या वयात आपल्या मनोरंजनासाठी आणि आपला ताणतणाव कमी करण्यासाठी इतर निरोगी पर्याय कोणते यावर शिक्षकांकडून तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून नियमित स्वरूपात मार्गदर्शन व्हायला हवे.

नाशिकमध्ये मानसोपचारतज्ज्ञांकडून नियमितपणे व्यापक स्वरूपात या विषयावर काम केले जाते. शाळा, महाविद्यालये, रोटरी क्लब, इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या विषयावर नियमित संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न असतो. सोशल मीडिया, वृत्तपत्रे, रेडिओ या माध्यमातून देखील व्यसनमुक्तीबद्दल सतत जनजागृती केली जाते. समाजाला व्यसनमुक्ती मिळवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे वाढवली पाहिजेत असे जरुरी नाही; तर या विषयावर जनजागृती हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. याबद्दलची शास्त्रीय माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. व्यसनमुक्ती केंद्रातील खर्चिक उपचार परवडत नसल्यास घरी राहून, स्वतःच्या जबाबदारीने, कुटुंबीयांच्या सहकार्याने, मानसोपचारतज्ज्ञांची औषधे आणि समुपदेशन यांची मदत घेत व्यसनांवर मात करणे शक्य आहे.
-डॉ. हेमंत सोननीस (मानसोपचारतज्ज्ञ)

पालकांची भूमिका महत्त्वाची
पालकांमध्येदेखील व्यसनांबद्दल जागृती खूप महत्त्वाची आहे. कारण मध्यम वयातदेखील व्यसने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, ज्यामध्ये दारू आणि सिगारेट यांच्या प्रमाण जास्त दिसते. मुलांच्या समोर दारूचे सेवन टाळणे. मुलांच्या समोर टीव्हीवर कार्यक्रम बघताना व्यसने, हिंसाचार इत्यादी गोष्टींचा उदात्तीकरण दाखवणारे कार्यक्रम बघितले जाणार नाही याची काळजी घेणे. मुलांशी वाढत्या वयात योग्य वेळी या विषयांवर संवाद साधणे. काही गोष्टी स्वतःच्या आचरणातून उदाहरण घालून देणे. काही वेळा आपल्या घरातले वातावरण तसे नसले तरी त्यावर संवाद साधणे. मुलांची मैत्री कोणाबरोबर आहे, संगत काय आहे, याकडे लक्ष देणे. या विविध उपायांचा अवलंब करायला हवा.

Ashvini Pande

Recent Posts

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

11 hours ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

11 hours ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

11 hours ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

1 day ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

3 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

3 days ago