उत्तर महाराष्ट्र

मातेने दिला एकाच वेळी तीन बालकांना जन्म* *दोन कन्यारत्न तर एक वंशाला दिवा*

*दिंङोरी प्रतिनिधी – सुकदेव खुर्दळ*
   एका महिलेने एकाच वेळी दोन बाळांना जन्म देणे ही बाब आता सर्वसामान्य झाली आहे. असे असले तरी मुळचे सुरगाणा तालूक्यातील व सध्या नाशिक येथे स्थाईक असलेल्या, एका महिलेने तीन बाळांना जन्म दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश असून बाळांसह त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे.
   याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरगाणा तालूक्यातील..  येथील सध्या नाशिक येथे रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय गायञी गणेश महाले यांना प्रसूतीसाठी नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दिं.  १६ रोजी दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी त्यांची प्रसूती झाली. यावेळी त्यांनी एक नव्हे दोन नव्हे तर चक्क तीन बाळांना जन्म दिला. या तिनही चिमुकल्यांच्या जन्म वेळेत अवघ्या एका मिनिटाचे अंतर असून आई आणि तिनही बाळाची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयांकडून सांगण्यात आले.या तीनही बाळांचे वजन अनुक्रमे २ किलो असे आहे. आई बाळांची प्रकृती चांगली आहे.  या महिलेची ही प्रसुतीची पहिलीच वेळ असून तब्बल १० वर्षांनी मुलं झाली. आईसह सर्व बाळं सुखरुप असल्याने या तीनही चिमुकल्यांच्या पावलांनी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावातील आणि परिसरातील ही बहुदा पहिलीच घटना असल्याने सदर विषय चांगलाच चर्चिला जात आहे.सद्यस्थितीला पती पत्नी दोघंही नौकरी व्यवसाय निमित्ताने कामात व्यस्त असल्याने, “हम दोनो हमारा एक”असे छोट्या कुटुंबिय पहायला मिळतात. पंरतू लग्न नंतर अनेक वर्षे मुलंबाळ व्हावे या अपेक्षेने वाट पहाणा-या महाले दाम्पत्याला दोन कन्या रत्न व एक वंशाला दिवा झाल्याने, आनंदाचे वातावरण आहे.
चौकट -१) पत्नीला तीन बाळं होतील असे सोनोग्राफीमध्येच कळले होते. तीन बाळ असल्याने सुरुवातीपासूनच गरोदरपणात महिलेची विशेष काळजी घेण्यात येत होती. मात्र तरीही चिंता सतावत होती की, बाळाची आणि आईची प्रकृती प्रसुतीपर्यंत चांगली रहावी. घरात एकाच वेळी तीन बाळांचे आगमन झाल्याने आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया महिलेचा पती  यांनी दिली.
Team Gavkari

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago