खून सत्र थांबेना; सातपूर प्रबुद्धनगरला अज्ञात व्यक्तीची हत्या

सिडको: दिलीपराज सोनार

शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून, दिवसाआड खुनाचे सत्र सुरू आहे. नाशिकरोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तोच आज पहाटे सातपुरच्या प्रबुद्धनगर येथे अज्ञात व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका १७ वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर पुरते भयभीत झाले आहेत
सातपुर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका ४५ वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाल्याची  माहिती सातपुर पोलिसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचे सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत नलावडे यांनी सांगितले याबाबत प्रबुद्ध नगरात परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ४५ वर्षेीय मृतावस्थेत पडलेला होता रात्र असल्याने हा प्रकार कुणाला कळला नाही परंतु दिवस उजाडल्या नंतर येणाऱ्या जाणा-यांच्या नजरेत ही घटना पडल्या नंतर परिसरातील नागरिकांनी सातपुर पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन तसेच यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून सातपुर पोलिस अधिक तपास करत आहेत

Bhagwat Udavant

Recent Posts

पाऊस, वादळामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…

1 hour ago

येवला तालुक्यात 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा

विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…

2 hours ago

नांदगावला पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक

नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांसोबत आमदार…

2 hours ago

नवीन घरातून 83 हजार रुपयांचा ऐवज लंपास

आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…

2 hours ago

वारसहक्काच्या वादातून सख्ख्या भावाचे अपहरण?

सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…

3 hours ago

कोचिंग क्लासेस चालवणार्‍या महिलेच्या घरात घरफोडी; 2 लाख 61 हजारांचा ऐवज लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील एका कोचिंग चालवणार्‍या महिलेच्या घरात…

3 hours ago