सिडको: दिलीपराज सोनार
शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून, दिवसाआड खुनाचे सत्र सुरू आहे. नाशिकरोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तोच आज पहाटे सातपुरच्या प्रबुद्धनगर येथे अज्ञात व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका १७ वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर पुरते भयभीत झाले आहेत
सातपुर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका ४५ वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाल्याची माहिती सातपुर पोलिसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचे सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत नलावडे यांनी सांगितले याबाबत प्रबुद्ध नगरात परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ४५ वर्षेीय मृतावस्थेत पडलेला होता रात्र असल्याने हा प्रकार कुणाला कळला नाही परंतु दिवस उजाडल्या नंतर येणाऱ्या जाणा-यांच्या नजरेत ही घटना पडल्या नंतर परिसरातील नागरिकांनी सातपुर पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन तसेच यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून सातपुर पोलिस अधिक तपास करत आहेत
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…