धबधबे प्रवाहित, घाटरस्त्यावर वाहन सावकाश चालवण्याचे आवाहन
दिंडोरी : प्रतिनिधी
सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे 4,600 फूट उंचीवर असलेला भाविकांचे श्रद्धास्थान असलेला सप्तशृंगगड बरसणार्या पावसामुळे हिरव्या भरजरी शालूने नटला आहे. गडावरील बहरलेल्या निसर्गसौंदर्याची भाविकांबरोबरच तरुणाईला भुरळ पडली आहे. येथील शांत वातावरणात धबधब्यांचा आनंद दूरवरून लुटावा, अशी इच्छा भाविकांची होत असते. घाटरस्त्यावर वाहने सावकाश चालवा, अशी सूचनावजा माहिती त्यांना स्थानिकांकडून देण्यात येत आहे.
गडावर कधी जोरदार, तर कधी रिमझिम या दुहेरी वातावरणाच्या मिलापाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठ-दहा दिवस झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने गडावरील निसर्ग खुलला आहे. गडावरील दर्याखोर्यांतील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होऊन चोहीकडे मनसोक्त बरसू लागले आहेत. त्यातच बहरलेल्या वृक्षवेली, उमललेली रानफुले, कारवीची निळ्याशार रंगाची फुले पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
त्यातच दाट धुक्याच्या झालरीमुळे गडावरील सृष्टिसौंदर्य पर्यटकांबरोबरच भाविकांनाही मोहित करत आहे. त्यामुळे भक्तीसह निसर्गमय असा दुहेरी आनंद लुटण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. दरम्यान, गडाच्या घाटरस्त्यावर डोंगराच्या कड्यावरून कोसळणार्या धबधब्यांबरोबर लहान-मोठे दगड येत असल्याने भाविक, पर्यटकांनी धबधब्याखाली न जाता दूरवरूनच आनंद लुटण्याची आवश्यकता आहे. याबाबत माहिती फलकही लावण्यात आले आहे. घाटरस्त्यावर व पठारी भागात दाट धुके असल्याने भाविकांनी वाहने सावकाश चालविण्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रदक्षिणा मार्ग धोकादायक
नांदुरी-सप्तशृंगगड घाटरस्त्यात छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने संबंधित विभागातर्फे जाळी बसविण्याचे कामही करण्यात आले आहे. या भागात वाहने थांबवू नयेत, याबाबत ग्रामपंचायतीने सूचना दिल्या आहेत. गडावरील प्रदक्षिणा मार्ग सर्वांंत धोकादायक असून, हा मार्ग गेल्या सहा वर्षांपासून बंद केला आहे. तरीही काही भाविक या भागात शिरकाव करतात. या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात. सप्तशृंगगडावर जाताना वळणाचा घाटरस्ता असून, भाविकांनी आपले वाहन काळजीपूर्वक चालवावे जेणेकरून अपघात होणार नाही.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…