निमाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सीईओची भेट
नाशिक: प्रतिनिधी
नाशिकच्या एचएएल कारखान्यास लाईट कॉमबॅक्ट एअरक्राफ्टच्या निर्मितीची मिळालेली ऑर्डर नाशिकची शान उंचविणारी आहे.नाशिकच्या उद्योजकांना त्याद्वारे सुटेभाग बनविण्याचे (इंडिनायझेशन)काम मिळाल्यास त्यामुळे या उद्योजकांचीही देश विकासाच्या कार्यात मोठा हातभार लागेल,असे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.
एचएएल कारखान्यास गेल्या महिन्यात 8800 कोटी रुपयांच्या ट्रेनर विमानांच्या निर्मितीची ऑर्डर मिळाली आणि आता लाईट कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट निर्मितीची ऑर्डर म्हणजे सोने पे सुहागा असेच त्याचे वर्णन करता येईल असे सांगून बेळे यांनी निमाच्या पदाधिकाऱ्यांसह एचएएलचे नूतन सीईओ साकेत चतुर्वेदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आणि त्यानंतर चर्चेच्यावेळी वरीलप्रमाणे प्रत्यक्ष मागणी केली.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना चतुर्वेदी यांनी निमाच्या कार्याचे कौतुक केले.एचएएलला जी ऑर्डर मिळाली त्याच्या सुट्या भागांचे निमाच्या सहकार्याने लवकरच खास प्रदर्शन भरविण्यात येईल,असे चतुर्वेदी म्हणाले.तसेच सुट्या भागांच्या निर्मितीचे काम नाशिकच्या उद्योजकांना देण्याबाबतच्या निमाच्या विनंतीचा विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याने नाशिकच्या उद्योजकांच्या आशाआकांक्षा उंचावल्या असल्याचे बेळे यांनी नमूद केले.
एचएएल आणि निमाचे खूप जुने संबंध आहेत.नाशिकला एचएएलचा फार मोठा व्हेंडरबेस आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न बघितले आहे.पोषक वातावरण आणि मुबलक अडलेल्या जागेचा विचार करून नाशिकला डिफेन्स हब बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने इंडिनायझेशनमध्ये सहभागी होण्याचे भाग्य नाशिकच्या उद्योजकांना लाभावे आणि येथील उद्योगव्यवसाय अधिक वृद्धिंगत होण्यास चालना मिळावी असे निमाला वाटते असेही बेळे म्हणाले. नाशिक हे एअरकनेक्टिव्हिटीने मोठयाप्रमाणात जोडले जावे यासाठी एचएएलने दिलेले योगदान मोलाचे असल्याचेही बेळे यांनी गौरवाने नमूद केले.यावेळी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार,कोषाध्यक्ष विरल ठक्कर,पॉवर एक्झिबिशनचे चेअरमन मिलिंद राजपूत,राजू वडनेरे आदी उपस्थित होते.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…