नाशिक

पोलिसांनीच हातात घेतले टिकाव, फावडे

इगतपुरी : प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या दिवसापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील तीनलकडी पुलावर पडलेले खड्डे न बुजवल्यामुळे सायंकाळी सहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी कोणत्याही प्रकारे गणेशमूर्तींना नुकसान होऊ नये व धार्मिक, सामाजिक बाधा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली अखेर पोलिसांनीच हातात टिकाव, फावडे घेऊन खड्डे बुजवले.
सतत कोसळणार्‍या पावसामुळे शहरातील तीनलकडी पूल व विपश्यना विद्यापीठाकडे जाणार्‍या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने त्यात शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध, तसेच महिला पडत. अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही खड्डे बुजविले गेले नाहीत. सण-उत्सव काळात या खड्ड्यांतून मिरवणुका जाणार असल्याचेही गांभीर्य सार्वजनिक बांधकाम विभागाला जाणवले नाही. पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मिरवणुकीच्या मार्गांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली होती. मात्र, शेवटपर्यंत खड्डेच न बुजवल्याने पोलिसांना खड्डे बुजविण्याची वेळ आली. तीनलकडी पूल ते हनुमान मंदिर, धम्मगिरी, ग्रामीण दवाखान्याच्या मार्गापर्यंत झालेले खड्डे बुजवून पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव व पोलीस पथकाने भरपावसात परिश्रम घेत सामाजिक बांधिलकी जोपासत अखेर खड्डेमुक्त रस्ता मोकळा करून दिला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तातडे, हवालदार विनोद गोसावी, दीपक निकुंभ, नीलेश देवराज, अभिजित पोटिंदे, करण ठाकूर, कृष्ण गोडसे, दीपक पटेकर, होमगार्ड सुरेश पंडित, दोंदे, मोंडे, भंडागे यांनी खड्डे बुजविण्याचे काम केले. दरम्यान, यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी शांतता
कमिटीत दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago