नाशिक

पोलिसांच्या तत्परतेने वाचले दोघांचे प्राण

साकोरा मिग फाट्यावर बसची दुचाकीला धडक

ओझर : वार्ताहर
येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साकोरा मिग फाट्यावर रस्ता ओलांडणार्‍या मोटारसायकलस्वाराला एसटी बसने धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वारासह महिला जखमी झाली. दोन्हीही जखमींना महामार्ग पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे पिंपळगाव रुग्णालयात रवाना केले.पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन्हीही जखमींचे प्राण वाचविले.
मुंबई- आग्रा महामार्गावर सोमवारी (दि. 3) सकाळी अकराच्या सुमारास ओझर पोलीस ठाणे हद्दीत साकोरे मिग फाट्यावर रस्ता ओलांडणार्‍या मोटारसायकलला (एमएच 15 एचजे 3963) नाशिककडून पिंपळगावकडे जाणार्‍या एसटी बसने (एमएच 06 एस 8073) धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार संतोष यादव देेवकर, मागे बसलेल्या सरला देवकर (दोघे रा. कसबे सुकेणे) हे गंभीर जखमी झाले. महामार्गावर पेट्रोलिंगसाठी निघालेले महामार्ग पोलिस पिंपळगाव केंद्राचे उपनिरीक्षक दीपक दोडे व सहकारी हवालदार नाईक, कोळी, वाघ व ढगे यांनी टोलनाक्याची रुग्णवाहिका बोलावून जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. तसेच अपघातामुळे विस्कळित वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातातील जखमी दोघांना महामार्ग पोलिसांनी तत्परतेने मदत केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले, असे स्थानिक नागरिक, वाहनचालकांनी सांगितले.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago