नाशिक

भंडार्‍याच्या उधळणीने आसमंत झाला पिवळा

अश्वाने बारागाडे ओढत ’जय मल्हार’च्या जयघोषात ओझरला यात्रेस प्रारंभ

ओझर : वार्ताहर
जेजुरीनंतर महाराष्ट्रातील ओझर मिग येथे भरणार्‍या व जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण असणार्‍या ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी खचाखच भरलेल्या बारागाड्या यात्रा मैदानात आल्या. त्यानंतर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मानाचा मल्हार नावाचा अश्व मोंढा गाड्यास जुंपून मोंढा गाडा व मानाच्या अश्वाचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर भंडार्‍याची उधळण होऊन ’सदानंदाचा येळकोट येळकोट’, ’जय मल्हार’, ’खंडेराव महाराज की जय’ अशा जयघोषाचा एकच निनाद झाला. पाहता पाहता मानाच्या अश्वाने लाखो भाविकांच्या साक्षीने बारागाडे ओढून नेले. यानंतर यात्रेला खरा प्रारंभ झाला.

जेजुरीनंतर जिल्ह्यातील पहिल्या मोठ्या ओझरच्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेच्या प्रारंभी बुधवारी (दि. 26) पहाटे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांंच्या मंदिरातील मूर्तीना श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर व मनीषा खेडेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख व प्रिया देशमुख यांच्या हस्ते मंत्रघोषात दुग्धाभिषेक केला.श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती सिनेअभिनेते श्रीश व दर्श राजेंद्र खेडेकर व यात्रा कमिटी मानकरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. मांडव डहाळे कार्यक्रमही झाला. हजारो भाविक सकाळपासून खंडेरायाच्या चरणी लीन होऊन वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण करून रांगेत उभे राहून खंडेराव महाराजांचे दर्शन घेत होते. अश्वाद्वारे ओढल्या जाणार्‍या बारागाड्यांवर सुशोभित फिरणारे एक चाक बसवलेले होते. या चाकावर लाकडी चोपा बांधून प्रत्येक टोकाला अडकविलेल्या सोडग्यावर शरीरसौष्ठव असलेले मल्ल कसरत करतानाचे दृश्य भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडताना दिसत होते. या बारा वाड्यांतील बारागाड्यांत विष्णू बापू पगार यांचा मानाचा गाडा (देवाचा गाडा) प्रथम उभा होता. या बारागाड्या गावातून वाजतगाजत यात्रा मैदानात आल्यानंतर त्या एकमेकांना जोडण्यात आल्या. तत्पूर्वी, मानाच्या अश्वाची गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढून बाणगंगा नदीपात्रातील पाण्यात मानाच्या घोड्याचे पाय धुऊन तेथे पूजा करून त्यास बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी आणले. अश्वास बारागाड्यांना जुंपून बारागाडे व अश्वाची आमदारांच्या हस्ते विधिवत पूजा केली. सदानंदाचा येळकोट येळकोट, जय मल्हार, खंडेराव महाराज की जय, असा एकच निनाद झाला.
यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख, नगरपरिषदेचे अधिकारी प्रशांत पोतदार, प्रतीक उंबरे, योगेश गोरे, हर्षद पगार, कैलास ठुबे, माजी आमदार अनिल कदम, रामराव गवळी, बाळासाहेब कदम, धमेंद्र जाधव, मोतीराम शेळके, ओमकोचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, शिवतेजचे संस्थापक व मोंढा गाड्याचे मानकरी भारत पगार, यात्रा कमिटीचे अध्यक्ष परशराम शेलार, उपाध्यक्ष उमेश देशमुख, बापू चौधरी, सतीश पगार, शिवा शेजवळ आदींसह नागरिक व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर घरोघरी तळी भरण्यात आली. यात्रा काळात समाजकंटकांवर व भुरट्यांवर नजर ठेवण्यासाठी यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यात्रेसाठी ओझरचे पोलिस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिसांसह मुख्यालय व वाहतूक शाखा कर्मचारी, होमगार्ड, गोपनीय विभाग, एलसीबीचे पोलिस कर्मचारी आदींनी बंदोबस्त ठेवला आहे.

 

आजपासून विविध कार्यक्रम

गुरुवारी (ता.27) सकाळी 7 वाजता देव हजेरी व दुपारी तीनपासून सोनेवाडी रोड येथे कुस्ती दंगल व विजेत्या मल्लांना बक्षीस वाटप. शुक्रवारी (दि. 28) बैलगाडा शर्यत आदी कार्यक्रम होणार आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago