महाराष्ट्र

पावसाचा हाहाकार; मराठवाड्यात आभाळ फाटल

सहा जणांचा बळी शाळांना सुट्टी लष्कराची मदत मुंबईत जनजीवन विस्कळीत

मुंबई :
राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि
नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात लष्कराची मदत घेण्यात येत आहे.

मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.तर लोकल वाहतूकही उशिराने सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे आणि कोकणात पुढील 48 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमी ठाणे, नवी मुंबई आणि बुलढाण्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे फक्त या दोन तालुक्यांतील शाळा उद्या बंद राहणार आहेत. दरम्यान, पावसाचे अलर्ट लक्षात घेऊन उद्या शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
मराठवाड्यात धुवाधार पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नांदेड 3, बीड 2, हिंगोलीत 1 जणाचा मृत्यू झाला. तर मराठवाड्यातील 57 महसूलमंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला. मुखेड तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. नांदेडमध्ये 4 ते 5 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने ओढे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. विदर्भात होत असलेल्या पावसाचे पाणी हिंगोलीच्या ईसापूर धरणात येत आहे. त्यामुळे ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. याच पैनगंगेने रौद्ररूप धारण केले आहे.
शाळा बंदचा निर्णय
बुलढाण्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. आज आणि उद्या तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यात बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले काठाच्या बाहेरून वाहत आहे. मन प्रकल्पाचे सर्व पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून मन नदीकाठच्या गावांना व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मौजे बोरगाव व धडकनाळ या गावांचा पावसामुळे संपर्क तुटला आहे. पाण्याने वेढलेल्या गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आतापर्यंत 70 कुटुंबे म्हणजेच 210 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून सतत मदतकार्य सुरू आहे. नांदेड लेह धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने लडो नदीला पूर आला आहे. कर्नाटकमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. परिणामी पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिगेली व हसना या गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. देगलूर तालुक्यातील होसणी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून लंडी नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने बाहेरगावच्या रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे. तुपरशाळगाव पुलावर पूर्णपणे वाहतूक बंद आहे.हदगाव तालुक्यातील शिकार येथील पैनगंगा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. बाभळी गावच्या शिवारात पाणी शिरल्याने रस्ता बंद झाला आहे. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुख्यमंत्र्यांकडून पुराचा आढावा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागाचादेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सुरु असून मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जात आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात (दि.18) पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

12 minutes ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

24 minutes ago

विंचूर-गोंदेगाव रस्ताकामाला अखेर मुहूर्त!

रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…

36 minutes ago

मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे; पारंपरिक कलाकुसरीला नवे कोंद

नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…

48 minutes ago

मनपाची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार

हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…

54 minutes ago

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

2 hours ago