लासलगावच्या पोलिसाला पाच हजारांची लाच घेताना पथकाने पकडले रंगेहाथ

लासलगावच्या पोलिसाला पाच हजारांची लाच घेताना अटक
नाशिक: प्रतिनिधी
लासलगाव येथील पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या कैलास सदाशिव बिडगर यास पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. डोंगरगाव येथील तक्रारदार यांचा शेती व्यवसाय असून त्यांच्यावर लासलगाव येथील पोलीस ठाण्यात कलम 324, 504,506 अनवय्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तसेच कोर्टात मदत करण्याच्या मोबदल्यात 10 हजारांची लाच हवालदार बिडगर याने मागितली होती. तडजोडीअंती पाच हजारावर सौदा ठरला.
त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला असता पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, हवालदार संदीप वणवे, पोलीस शिपाई संजय ठाकरे, परशुराम जाधव यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले, अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Bhagwat Udavant

Recent Posts

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल, या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…

1 hour ago

नर्मदे हर

नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…

3 hours ago

संकोच

*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…

4 hours ago

बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!

*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718   लोकशाही प्रणालीत…

4 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द, नेमके काय कारण घडले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…

4 hours ago

संडे अँकर : तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका

  संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…

5 hours ago