भाजप-शिंदेसेनेचा घेणार समाचार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रचाराकरिता उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या तोफा आज शुक्रवारी (दि.9) धडाडणार आहेत. ठाकरे बंधूंची प्रथमच संयुक्त सभा नाशकात होत असल्याने दोन्ही पक्षांसह नाशिककरांची उत्सुकता ताणली गेली आहे. ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरेे मैदानावर सायंकाळी सात वाजता सभेला सुरुवात होणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट व मनसे यांची युती झाली असून, नाशिकमध्येही युतीत जागा लढवल्या जात आहेत. उद्धव-राज यांची युती झाल्यानंतर प्रथमच त्यांची संयुक्त सभा होणार आहे. ठाकरे बंधू भाजपसह शिंदेसेनेचा या सभेतून खरपूस समाचार घेण्याची शक्यता आहे. विशेषत: भाजपने 2017 नंतर पालिकेतील सत्ताकाळात दिलेले विकासाचे आश्वासन व दत्तक नाशिकवरून भाजपवर तोंडसुख घेण्याची शक्यता आहे. याशिवाय, तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्याला हात घातला जाणार का? याकडेही लक्ष लागले आहे. कान्हेरे मैदान व ठाकरे परिवार एक नातं असून, दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्याकरिता हेच मैदान तुडुंब भरायचे. त्यांच्यानंतरही उद्धव-राज यांनी हे मैदान लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी गाजवले आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक ठाकरे गट व मनसे ताकदीने लढवत आहे. त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादीदेखील आहे.
The Thackeray brothers’ cannon will explode in Nashik today
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…