नाशिक

कसारा ते मनमाड होणार तिसरी व चौथी रेल्वे लाइन

केंद्र मंत्रिमंडळाकडून मंजुरी

नाशिक : प्रतिनिधी
केंद्र मंत्रिमंडळाने कसारा-मनमाड रेल्वेमार्गावर तिसरी व चौथी लाइन टाकण्यास मंजुरी दिली आहे. 131 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी सुमारे 10,154 कोटींची तरतूद करण्यात आली असून, मुंबई-हावडा उच्च घनता रेल्वेमार्गाची वहनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
हा प्रकल्प कसारा ते मनमाडदरम्यान राबवण्यात येणार असून, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना थेट लाभ होणार आहे. मार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवासी गाड्यांची संख्या वाढेल. वेळेची बचत होईल तसेच मालवाहतुकीत सुमारे 46.1 एमटीपीए इतकी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होईल.
या प्रकल्पामुळे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना उत्तम रेल्वे जोडणी मिळणार आहे. यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भावली धरण आणि श्री घाटनदेवी माता मंदिर यांचा समावेश आहे.
आर्थिक व पर्यावरणीय दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. सुधारित लॉजिस्टिक्समुळे दरवर्षी सुमारे 1,207 कोटींची बचत अपेक्षित असून, 54 कोटी किलो कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे. ही घट साधारणपणे 2.2 कोटी झाडे लावल्याइतकी असल्याचे
मानले जाते.
एकूणच, कसारा-मनमाड चौपदरीकरण प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या उत्तर-दक्षिण रेल्वे दळणवळणाला नवी गती मिळणार असून, प्रवासी, उद्योग, व्यापार आणि पर्यावरण सर्वच घटकांना दीर्घकालीन लाभ होणार आहे.

The third and fourth railway lines will be built from Kasara to Manmad.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

2 hours ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

7 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

7 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

7 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

7 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

8 hours ago