बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या जाणार्या बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात भव्य काशीविश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला जात आहे. 40 बाय 36 फूट क्षेत्रफळात उभा राहणारा हा देखावा, गणेशभक्त आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास मुदलियार यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या फाउंडेशनच्या बैठकीत गणेशोत्सव अध्यक्षपदी विशाल कुलथे यांची निवड करण्यात आली. तसेच, वाराणसी येथून काशीविश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी प.पू. स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, प.पू. श्रीकांतजी मिश्र, महंत श्रीरामसनेहीदास महाराज (बडा लक्ष्मीनारायण मंदिर, तपोवन), श्रीमहंत भक्तिचरणदास महाराज (पंचमुखी हनुमान मंदिर, तपोवन), भागवताचार्य माधवदास महाराज राठी, तसेच धर्माचार्य संपर्कप्रमुख विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आचार्य महंत कालिकानंदजी महाराज (सिडको, नाशिक) आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुदलियार यांनी दिली. गिरीश मुदलियार, महिंद्र अहिरे, कमल मूर्ती, सतीश म्हस्के, नितीन उबाळे, हेमंत जैसवाल, हरीश हेगडे, योगीराज माळेगावकर, सागर चव्हाण यांच्यासह देखाव्याचे काम मुंबई येथील गणेश म्हात्रे हे
करीत आहेत.
गणेशमूर्ती आगमन सोहळा
यावर्षी काशीविश्वनाथ मंदिराचा देखावा असणार आहे. 40 बाय 36
फूट रुंदीचा देखावा असून, यावेळी 55 कामगार काम करीत असून, 25 ऑगस्टपर्यंत काशीविश्वनाथ मंदिराचा देखावा पूर्ण होणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्टपासून हा देखावा भाविकांसाठी खुला होईल. याच दिवशी गणेशमूर्ती आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात उज्जैन येथील ढोलपथकाचे गगनभेदी वादन वातावरण भारावून टाकणार आहे.
पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…
मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…
मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…
दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी…
खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस आदिवासी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश महेश शिरोरे खामखेडा:…