पुरुषोत्तम नाईक

मेष : अडचणी वाढतील
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांची मनस्थिती द्विधा होईल. शासकीय कोर्ट, कचेरीची कामे लांबणीवर पडतील. कार्यालयात विरोधक षडयंत्र रचतील. आरोग्य सांभाळा.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. आरोग्य चांगले राहील. शेअरमध्ये लाभ होतील.
मिथुन : आर्थिक दिलासा
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि, राहू केतू अनुकूल आहेत. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्च वाढतील. नोकरदारांची अस्वस्थता वाढेल. कामे दुरावतील. कामांचे प्रमाण कमी होईल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक दिलासा मिळेल. शेअर म्युच्युअल फंडात गुंतवणूक टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क : कौतुक होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : पदोन्नती मिळेल
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, बुध, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील. नोकरदारांना पदोन्नतीसह पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. शेअरमध्ये लाभ होतील.
कन्या : धनचिंता मिटतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंता मिटतील. नोकरदारांना उन्हाळा, पावसाळा परिस्थिती राहील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक गणिते जुळतील. मनावर ताबा ठेवा. वाद, भांडणे टाळा, प्रकृती जपा.
तुळ : कामे सुरू राहतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा. वाहन सांभाळून चालवा. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची कामे सुरू राहतील. आनंदवार्ता कळतील. शेअरमध्ये लाभ होईल. प्रकृती चांगली राहील.
वृश्चिक : गणिते जुळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. शेअरमध्ये गुंतवणूक करणे टाळा. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे अडचणीत येतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळतील. आरोग्य जपा.
धनु : विवाह जमतील
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांचे वरिष्ठांशी वाद होतील. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. अविवाहितांचे विवाह जुळतील. मनाप्रमाणे अनुरूप वधूवर मिळतील.
मकर : जोरदार आगेकूच
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी कुठल्याही मोहात अडकू नये. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे अडचणीत येतील. शेअरमध्ये गुंतवणूक टाळा.
कुंभ : प्रश्न मिटतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचे प्रश्न सुटतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. परिस्थितीत सुधारणा होईल. खर्च वाढतील. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवा. नोकरदारांना वरिष्ठांच्या नाराजीस तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. प्रकृती चांगली राहील.

Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

20 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

39 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

46 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

55 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago