नाशिक

यवतमाळच्या युवकास आठ लाखांचा गंडा

पोस्टात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड मधील पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून यवतमाळ येथे राहणाऱ्या एका बेरोजगारास तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ढक्कदायक प्रकार समोर आला आहें.  याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ येथे राहणारे शरद दत्तात्रय आडे यांनी यासंदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांचा मुलगा पृथ्वीन यास नाशिकरोड पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी लावून देतो असे सांगून परिसरात राहणारे विनोद शेळके देवानंद गायकवाड तसेच रोडे व घोष पूर्ण नाव माहित नाही यांनी शरद आडे यांना यवतमाळ येथून आणले व त्याला तर नाशिकरोड परिसरात वरील चौघांनी आडे यांना  त्यांच्या मुलाच्या  नावाची ऑर्डर बनावट नोकरीची देऊन फसवणूक केली दरम्यान आडे यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन गाठले व या संदर्भात तक्रार दाखल केली दरम्यान या घटने प्रकरणे पोलिसांनी वरील चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नाय दे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहे.
Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

2 days ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

2 days ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

2 days ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

2 days ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

2 days ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

2 days ago