नाशिक

आज आदित्य ठाकरेंची नाशिकरोडला सभा

 

 

 

शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण: विजय करंजकर

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्रीआदित्य ठाकरे सोमवारी ( दि.6) रोजी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच दिवशी सांयकाळी सहा वाजता नाशिकरोड येथे त्यांची आनंदऋषीजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जंगी जाहीर सभा होणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,अशी माहिती जिल्हाप्रमुख  विजय करंजकर यांनी दिली.

 

सभेच्या नियोजनाबाबत शालिमार येथील शिवसेना कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना करंजकर  बोलत होते.शिवसेना उपनेते सुनिल बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,  महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजीआमदार वसंत गिते, योगेश घोलप, मनपा माजी गटनेते विलास शिंदे,उप जिल्हाप्रमुख जगनराव आगळे,युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर,माजी महानगरप्रमुख सचिन मराठे,महेश बडवे आदी व्यासपीठावर होते.

 

आदित्य ठाकरे यांची युवकांमध्ये चांगली प्रतिमा  आहे. त्यामुळे ते या घटकांविषयी काय बोलतात याची  उत्सुकता आहे.

 

असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले. गद्दारांनी दगा दिल्यानंतरही न डगमगता आदित्य ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवल्याने त्यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे. असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकांत ठाकरे गट निर्विवाद विजय मिळवेल आणि पक्षाची एकहाती सत्ता येईल यात शंका नाही.त्यामुळे पक्ष  कार्यकर्त्यांनी आदेशाची वाट न बघता सर्व शक्तीनिशी कामाला लागून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करावे तसेच बालेकिल्ल्यात होणाऱ्या सभेला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन माजी आमदार वसंत गिते व माजी म.न.पा.गट नेते विलास शिंदे यांनी केले.

 

बैठकीस भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के,भगवान आडोळे,संपत चव्हाण,माजी महापौर नयना घोलप,माजी उप महापौर प्रथमेश गिते,माजी नगरसेवक संतोष गायकवाड,केशव पोरजे,भैय्या मणियार,सुनिता कोठुळे आदींसह नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतीनीधि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

6 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago