नाशिक: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी चा आजचा शेवटचा दिवस असल्याने लढत सोपी होण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला माघार घेण्यास भाग पाडले जात आहे, आतापर्यंत नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजपचे बंडखोर इंजिनीअर दिलीप भामरे, छावा चे करण गायकर, डॉ. डी एल. कराड, नाशिक मध्य मधून मनसेचे अंकुश पवार यांनी माघार घेतली आहे. शेवटच्या टप्प्यात अजून कोण माघार घेतो याकडे लक्ष लागून आहे, करण गायकर यांनी पश्चिम मधून माघार घेतली असली तरी पूर्व मतदार संघातून त्यांची उमेदवारी कायम आहे.
दिंडोरीतून धनराज महाले यांची अखेर माघार
महायुतीचे व एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे बंडखोर उमेदवार व माजी आमदार धनराज महाले यांनी उमेदवारी मागे घेतली, विशेष म्हणजे हेलिकॉप्टरने त्यांना एबी फॉर्म पाठवला होता.
हेमलता पाटील यांनीही घेतली माघार
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार हेमलता पाटील यांनीही पक्षाच्या वरीष्ठनेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…