अहवाल येण्यास एक वर्ष
निफाड : प्रतिनिधी
विष्णूनगर (ता. निफाड) येथे क्रीडांगणाचे (प्ले ग्राउंड) किरकोळ काम करून सात लाखांचा अपहार झाल्याचा अंदाज व्यक्त करून माहिती अधिकारात गटविकास अधिकार्यांकडे अर्ज केला असता, दोन महिन्यांनंतर क्रीडांगणाच्या पाहणीसाठी मुहूर्त ठरला. विस्तार अधिकारी राजेश थोरात व गौरवकुमार हिरे पाहणीसाठी आले. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत अहवाल मिळेल, असे सांगितले, पण एक वर्ष
होऊनही कुठलाही अहवाल मिळाला नाही.
क्रीडांगणाचे किरकोळ काम करून सात लाख रुपये कोणाकोणाच्या खिशात गेले, असे ग्रामस्थांत बोलले जात आहे. संबंधित अधिकार्यांची वरिष्ठांनी चौकशी करावी. गटविकास अधिकार्यांंचा संबंधित अधिकार्यावर कुठलाही वचक नसल्याचे लक्षात येते. आता एक वर्षानंतर तरी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना जाग येते का, हे पाहावे लागेल. ग्रामसेवक व विस्तार अधिकार्यांवर कारवाई होईल का, हे पाहणेेही तितकेच महत्त्वाचे आहे.
विष्णूनगर येथे क्रीडांगणासाठी सात लाख व संरक्षक भिंतीकरिता सात लाख, असा एकूण 14 लाख निधी आला होता. पण किरकोळ कामे करून मोठा अपहार झाला आहे. त्यावेळी सुनील शिंदे ग्रामसेवक होते. त्यावेळच्या लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकांंनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा दावा आहे.
– रामदास घायाळ,
माजी सरपंच
144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…
विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…
नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांसोबत आमदार…
आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…
सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…
सिडको : विशेष प्रतिनिधी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील एका कोचिंग चालवणार्या महिलेच्या घरात…