नाशिक

सोन्या-चांदीचे दागिने विक्रीस आणणारा चोर जेरबंद

घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगिरी

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याबाबत आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हेशाखा युनिट-2 च्या एका अट्टल चोरट्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेडगेवारनगर येथे एक महिन्यापूर्वी घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधून एक अनोळखी इसम घरात घुसला. त्याने लोखंडी कपाट उघडून लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने चोरले. या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन व मनोज परदेशी यांना एक इसम हेडगेवार नगर परिसरात चोरीचे दागिने विक्रीस आणणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या अधारे आणि प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर त्यांच्या सूचनेनुसार गुन्हेशाखा युनिट-2 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सापळा रचून उंटवाडी येथील अमरधाम जवळून संशयितास ताब्यात घेतले.
या गुन्ह्यातील तपासादरम्यान आरोपीने स्वतःचे नाव स्वप्नील संजय पवार (वय 19, रा. पाटीलनगर, नवीन सिडको, नाशिक) असे सांगितले असुन पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 38 हजार350 रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने अंबड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला गुन्हा उघडकीस आला आहे.
आरोपीस पुढील कारवाईसाठी अंबड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-2 चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलिस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, सुहास क्षीरसागर, पोलिस हवालदार संजय सानप, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे आणि संजय पोटिंदे यांनी केली.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago