पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भाविकांत संताप, सुरक्षिततेचा प्रश्न
सिन्नर : प्रतिनिधी
बंजारा समाजाचे कुलदैवत आणि गावाचे ग्रामदैवत असलेल्या सतीदेवी-सामतदादा यात्रेत यंदा महिला चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला. दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना लक्ष्य करत एका सराईत टोळीने गर्दीचा फायदा घेत लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यात्रेत मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही हे प्रकार घडल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मंदिर परिसरात सीसीटीव्ही असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा यात्रा पटांगण, स्टॉल्स, रहाटपाळणे आणि बसस्थानक परिसराकडे वळवला. गर्दीत जाणीवपूर्वक धक्का देत महिलांच्या गळ्यातील लांब सोन्याच्या पोथ्या सराईतपणे कापून पळ काढण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या चोर्यांमध्ये किर्तांगळी येथील सत्यभामा चव्हाणके यांची साडेतीन तोळ्यांची पोत (सुमारे 5 लाख रुपये), वडांगळी येथील चित्रा काळे यांची साडेतीन ग्रॅमची पोत, तर खडांगळी येथील गौरी कोकाटे यांची तीन ग्रॅमची सोन्याची पोत चोरीस गेली आहे. याशिवाय, तानाजी ठोक यांच्या पत्नीचे व इतर अनेक महिलांचे दागिनेही लंपास झाले आहेत.
महिला चोरट्याला सोडून दिल्याची चर्चा
यात्रेत संशयास्पद महिलांची टोळी फिरत असल्याची माहिती भाविकांनी पोलिसांना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. चोरी करताना एका महिलेला पकडण्यात आले, पण दागिने परत मिळाल्यानंतर तिला सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे बोलले जात असून, पुढील काळात यात्रेत कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी गावकर्यांकडून केली जात आहे.
Thieves steal jewellery worth lakhs during Vadangi Yatra
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…