कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे व्यापक पाऊल
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आणि कुपोषणमुक्त जिल्हा घडविण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषद प्रशासनामार्फत 9 ते 21 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘कुपोषण निर्मूलनासाठी धडक शोधमोहीम’ राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना संयुक्त विद्यमाने ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत 0 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार व आवश्यक पोषण व्यवस्थापन केले जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याने बालकांच्या पोषणावर विपरीत परिणाम होतो. यामुळे कुपोषण व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. तसेच छऋकड-5 मधील कुपोषणाचे प्रमाण आणि पोषण ट्रॅकरमधील नोंदी यामधील तफावत लक्षात घेता वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात
आली आहे.
मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे सर्व बालकांची आरोग्य तपासणी, प्रलंबित लसीकरण पूर्ण करणे, कुपोषित बालकांवर उपचार करणे आणि स्थलांतरित बालकांसह एकही बालक तपासणीपासून वंचित राहणार नाही याची खात्री करणे. तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके कार्यरत राहणार असून, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांचा समावेश आहे.
मोहिमेदरम्यान आढळणार्या तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात येणार असून, गंभीर स्थितीतील बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात संदर्भित केले जाईल. उपचारानंतर पुढील 12 आठवडे काटेकोर पाठपुरावा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पालकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
‘Dhadak Search Mission’ from February 9 to 21
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…