नाशिक

यंदा पावसामुळे रानभाज्यांचे लवकर आगमन

ग्राहकांची मागणी; निसर्गत: उगवलेल्या भाज्यांत पोषकतत्त्व अधिक

दिंडोरी : प्रतिनिधी
सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या आदिवासी भागात पावसाळ्यात येणार्‍या रानभाज्यांचे यंदा लवकर आगमन झाले आहे. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेती किंवा निगा न करता निसर्गतःच उगवलेल्या भाज्यांमध्ये पोषकतत्त्व असल्याने आयुर्वेदात या भाज्यांना वरचे स्थान आहे. जंगलात शेतांच्या बांधावर, माळरानात त्या आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. आदिवासी भागात त्या आवर्जून खाल्ल्या जातात. आदिवासी भागात शेवळा, वाघाटा, दिघडी आदींचा आजही पारंपरिक अन्न म्हणून वापर होतो. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून, जुन्या पिढीतील व्यक्तींना भाज्यांचे औषधी गुणधर्म माहीत आहे. नवीन पिढीतही हे ज्ञान कायम आहे. या वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनल्या आहेत. बाजारपेठेतून येणारा भाजीपाला विकत घेण्यापेक्षा जंगलात येणार्‍या रानभाज्या शोधण्यासाठी आदिवासी लोक आता भर देत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात
झाली आहे.

रानभाज्या या जंगलात बिगरखतांच्या उगवत असल्याने या भाज्या खाल्ल्यास शरीरास उपयोगी पडणारे क्षारांचे प्रमाण म्हणजे प्रोटीन, कॅल्शिअम, टाइप टू न्यू ट्रेन जास्त असतात. आम्ही नागरिकांना पावसाळ्यात रानभाज्या खाण्याचे आवाहन करत असतो.
– डॉ. दिलीप रणवीर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुरगाणा

या आहेत रानभाज्या

शेवळा, चाई, कवळी, मोखा, इगळी, रुखाळू, तेरा, दिघडी, वाघाट, तरण, काटवल, माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, केना, कोंबडा, तरोटा, पानवेल, काळा पेठारा, पांढरा पेठारा, बांबूवाष्टे, भराटी, मटारू, राजगिरा, रानआल, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, तांदुळजा, पाथरी, माठ, घोळ, टाकळा, सराटे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

35 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

37 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

51 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

56 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

60 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago