नाशिक

रिक्षाचालकास मारहाण करून लूटमार करणारे जेरबंद

दिंडोरी पोलिसांची कारवाई; सराईतांकडून रिक्षासह रोकड जप्त

दिंडोरी : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील जऊळके शिवारात रिक्षाचालकास मारहाण करून त्याची रिक्षा, रोकड व मोबाइल लुटणार्‍या सराईत गुन्हेगारांना दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
फिर्यादी आपली रिक्षा (एमएच 15-इएच 2991) घेऊन 10 एप्रिलला नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील रिक्षाथांब्यावर उभा असताना, संशयितांनी संगनमत करून त्यांना गंगापूर रोडकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर जऊळके गावाजवळ नेऊन फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी रिक्षा व सुमारे 80 हजारांंची रोकड, तसेच एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व सुमारे नऊ हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण सुमारे 93 हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी रेल्वेने मुंबईहून नाशिककडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींना अटक केली. एक आरोपी पसार झाला. अटक केलेल्या आरोपींमध्ये इरफान ऊर्फ पप्पा शेख (वय 26, रा. नाशिक) व जावेद सलीम पठाण (वय 30, रा. नाशिक) यांचा समावेश आहे. पसार आरोपीचे नाव नवाज मनसूर शेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून चोरीस गेलेली रोकड व रिक्षा जप्त केली आहे. आरोपींपैकी जावेद पठाण सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर नाशिक जिल्ह्यात यापूर्वीही पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते, तरीही तो गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईसाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक अल्ताफ शेख, सुदाम बांबळे, पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड, सुमित आवारी, विजय कोरडे, गेणू निंबेकर, प्रेमानंद मुंढे, कमलेश देशमुख, अविनाश आहेर, विशाल पैठणकर तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण अंमलदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

Those who beat up and robbed a rickshaw driver were arrested.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago