एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने 16 ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करत सुमारे एक लाख 75 हजार रुपये किमतीचा 34 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीन निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विजय सुखदेव सोनवणे (वय 39, रा. फर्नांडिसवाडी, जयभवानी रोड) याने आपल्या घरी एमडी अमली पदार्थ साठवून ठेवला असल्याचे समजले. सदर माहितीची खात्री करून शासकीय पंच, श्वान पथकासह अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. सोनवणेच्या घरातून एक लाख 70 हजार रुपये किमतीचे 34 ग्रॅम एमडी आणि पाच हजार 100 रुपये किमतीच्या इतर वस्तू, असा एकूण एक लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपासात सोनवणेचे साथीदार रोहित नेहे (वय 28, रा. विहितगाव) व कैफ पठाण (रा. सिन्नर फाटा) यांनाही अटक करण्यात आली. आरोपी रोहित नेहे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात यापूर्वीही एन.डी.पी.एस. अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई वपोनि सुशीला कोल्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, सचिन चौधरी, रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, हवालदार बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, अंमलदार गणेश वडजे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, फुलपगारे, मपोअं अर्चना भड, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा, नाशिक शहर, बी.डी.डी.एस. श्वान पथक व पोलीस कर्मचारी कोंडे, ससाणेे आणि कोल्हे यांनी पार पाडली.
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…