सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सिडको : विशेष प्रतिनिधी
एमआयडीसी चुंचाळे भागातील कंपन्यांमध्ये चोरी करणार्या टोळीतील आरोपींना अटक करत अंबड पोलिसांनी सुमारे 3 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेला आरोपीही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) मोनिका राऊत व सहा. पोलीस आयुक्त (अंबड विभाग) शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेतला असता, भटू सुरेश बोरसे (वय 29, रा. पाथर्डी फाटा) याच्यासह दोन विधिसंघर्षित बालक ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांच्या ताब्यातून 440 अर्थ कॉन्टॅक्ट कॉपरचे पार्ट, 17 लोखंडी प्लेट, 815 किलोचे लोखंडी शीट असा एकूण 3 लाख 25 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सपोनि गणेश मुगले, पो.उ.नि. मुक्तेश्वर लाड, पोहवा संदीप साळवे, राहुल सोनवणे, पोशि किरण सोनवणे, जनार्दन ढाकणे, जितेश शिंदे, योगेश्वर जाधव, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी, विश्वास साळुंखे, संदीप खैरनार, अर्जुन कांदळकर, विजय सोनवणे, ज्ञानेश्वर सहाणे व महिला पोशि आरती भालेकर यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…